Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण; गृहमंत्री म्हणतात, भर चौकात त्याला फाशी दिली पाहिजे, पण…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 July 2023, 18:00

Mumbai News : मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या मुद्द्यावर विरोधकांनी आज सरकारला धारेवर धरले. एकीकडे सत्य बोलणारे राहुल गांधी यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली जाते. दुसरीकडे महापुरुषांबाबत लिखाण करणारे राज्यात मोकाट फिरतात. हा कसला न्याय? असा सवाल विरोधकांनी सरकारला केला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. प्रचंड गदारोळ झाला आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.

सत्ताधाऱ्यांचा निषेध करत विरोधकांचा सभात्याग

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून त्यांनी दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. (Mumbai News) या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे, असे भुजबळ यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एका वेबसाईटने आक्षेपार्ह लेख लिहून त्यांची बदनामी केली.(Mumbai News)  मोठ्या राजकारण्यांबद्दल कुणी काही लिहीले तर चोवीस तासाच्या आत सायबर पोलीस अ‍ॅक्टिव्ह होतात. आकाश पाताळ एक करून त्यांना उचलून आणतात. परंतु, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल इतके आक्षेपार्ह लिहिणारा त्यांना सापडत नाही? असा सवाल आव्हाड यांनी करून हे आरोपी कधी पकडणार हे सरकारने सांगावे, अशी मागणी त्यांनी केली.

 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत ज्यांनी विकृत लेखन केले त्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून त्यांची धिंड काढून रस्त्यावरून फिरवले पाहिजे. पण, सरकार त्यावर कारवाई करण्याऐवजी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत अशी टीका केली. (Mumbai News) एकीकडे सत्य बोलणार्‍या राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी दोन वर्षांची शिक्षा केली जाते. तर दुसरीकडे महापुरुषांबाबत लिखाण करणारे, विकृत गुन्हेगार मोकाट फिरतात. हा कसला न्याय? असा थेट सवाल त्यांनी केला.

यावर उत्तर देताना गुन्हेगाराची धिंड नव्हे तर भर चौकात त्याला फाशी दिली पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र, यात कायद्याने कारवाई करावी लागेल. ज्या वेबसाईटने वृत्त दिले त्याच्यावर कारवाई केली आहे. यासंदर्भात ट्विटरला तीन पत्र लिहिली असून, त्याची माहिती मागविली आहे. (Mumbai News) पोलीस सातत्याने ट्विटरच्या संपर्कात आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल चुकीचे लिखाण करणाऱ्याला पाठिशी घालणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मात्र, त्यांच्या उत्तरावर विरोधकांनी हरकत घेत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. (Mumbai News) यामुळे सत्ताधारी विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाली. अखेर सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : लाईट, कॅमेरा, अॅक्शन म्हणताच सेटवर बिबट्याची एंट्री… ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या सेटवर थरार!

Mumbai News : मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक!

Mumbai News : मुंबईत कंत्राटी पोलीस भरती होणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00
Next Post

Saswad News : गराडे येथील बारावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तब्बल १० वर्षानंतर ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.