Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनोज जरांगेंवर महिलेचा गंभीर आरोप! ‘जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सत्य बोलेन’ म्हणत डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 29 September 2026, 11:11

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या अडचणींमध्ये आणखी एका तक्रारीची भर पडली आहे. त्यांच्या आंदोलनात यापूर्वी सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनी मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ करणे, एआयच्या माध्यमातून अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार करून बदनामी करणे तसेच धमक्या देणे, असे आरोप त्यांनी केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ललिता तारख या यापूर्वी मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनात सक्रिय होत्या. मात्र, आता त्यांनी जरांगे यांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर आपल्याबाबत विविध प्रकारचे आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण पैसे घेतले, आपल्याला किती लाखांचे पॅकेज मिळाले, प्लॉट घेतला का, अशा स्वरूपाचे प्रश्न आणि आरोप सोशल मीडियावर केले जात असल्याचा दावा तारख यांनी केला.

या पार्श्वभूमीवर २०२३ पासून आपल्या तसेच संबंधित व्यक्तींच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. चौकशी झाल्यानंतर कोणाच्या संपत्तीत किती वाढ झाली, हे स्पष्ट होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच सोशल मीडियावर अश्लील कमेंट करणाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांचाही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

ललिता तारख यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सुनेत्रा पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सत्य समोर येण्याची वेळ आल्यावर आपण सर्व माहिती बोलू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, प्रकृती खालावल्याने बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे त्यांनी उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर त्यांच्या आंदोलनाशी संबंधित व्यक्तींवर विविध प्रकरणांमध्ये कारवाई आणि चौकशी होत असल्याने मराठा आंदोलनाच्या वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31
Next Post

दौंड येथील भीमा नदीकाठी रंगला ‘तीन पानी’चा डाव; 5 जणांना पोलिसांनी पकडलं रंगेहाथ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp