Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पैसे मुलीच्या नावावर बँकेत टाकायचे की प्रॉपर्टी घ्यायची’, बस्स… एवढ्यावरून पतीचा खून करत मृतदेह पोत्यात बांधून नदीत फेकला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 September 2024, 21:23
Raigad police arrested couple for murdering old man shrivardhan

अहमदपूर : शेती विक्रीतून आलेले पैसे मुलीच्या नावावर बँकेत टाकायचे की अहमदपूरात प्रॉपर्टी घ्यायची या कारणावरून, तसेच मयत हा एका व्यक्तीस घरी येण्यास विरोध करत असल्याचा राग मनात धरून पत्नीने अन्य एकाच्या मदतीने पतीचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात बांधून गोदावरीत नदीत फेकला. याबाबत मृताचा भाऊ नागनाथ गुरुनाथ नागवंशी (रा. गांधी चौक बसवकल्याण जि. बिदर, कर्नाटक) यांनी अहमदपूर पोलिसांत तक्रार दिली होती. त्याआधारे पोलीसांनी मंगळवारी (दि.१०) रात्री मृताची पत्नी व अन्य एकावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी अहमदपूर पोलिसात नागनाथ नागवंशी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ मोहन गुरुनाथ नागवंशी (मयत) यांचे २५ वर्षांपूर्वी अहमदपूर येथील स्वाती माणिकराव धडे (५४) हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली झाल्यानंतर आमच्याच गावातील बसवकल्याण येथील आनंद धनुरे आणि आमच्या भावाची मैत्री झाली होती. त्यामुळे तो आमच्या घरी सतत ये-जा करत असे. त्यानंतर आनंद धनुरे व स्वाती नागवंशी (भावजय) यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाल्याचे परिवारातील सदस्यांना समजले असता स्वाती नागवंशी ही भावाला घेऊन अहमदपूरमध्येच भाड्याने रूम घेऊन राहत होती. आनंद धनुरे हा अधूनमधून अहमदपूर येथील भावाच्या घरी जात असे. तो भावाच्या आर्थिक व्यवहारात ढवळाढवळ करायचा, असे मोहनने (५८) गावाकडे आल्यावर आम्हास सांगितले. सतत घरी येणे, व्यवहारात ढवळाढवळ करणे मोहनला पटत नव्हते.

परंतु, त्यास स्वातीचा पाठिंबा होता. त्या दोघांनी माझ्या भावास बसवकल्याणची जमीन विकून अहमदपूरला प्रॉपर्टी घ्यायची आहे, असा तगादा लावला. जमिनीचे पैसे माझा भाऊ मोहन हा मुलींच्या नावावर टाकायचे म्हणत होता. परंतु, स्वातीला त्या पैशातून शहरात प्रॉपर्टी घ्यायची होती. या कारणासह आनंद धनुरे घरी येण्यास भावाचा विरोध असल्यामुळेच स्वाती नागवंशी आणि आनंद धनुरे यांनी मोहन यांचा ६ सप्टेंबर रोजी रात्री ११ : ३० च्या सुमारास राहत्या घरी खून केला. त्याचा मृतदेह पोत्यात बांधून दुचाकीवरुन अहमदपूर येथून नांदेड येथे घेऊन जात गोदावरी नदीवरील वाजेगाव भागातील जुन्या पुलावरून नदीच्या पात्रात फेकून देऊन पुरावा नष्ट केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:37

Hadapsar News : लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून ४ वर्षांच्या चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू, चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:10
Next Post
India to face severe winter and extended monsoon due to La Niña

निना 'मुळे यंदा घसरणार पारा; देशात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता, डब्ल्यूएमओचा अंदाज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.