Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रंगभूमी गाजवण्यासाठी दिग्गज कलाकार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल; प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांच्या हस्ते ‘जिगीषा नाट्यसहवास’चे उद्‌घाटन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 7 August 2026, 14:28

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जिगीषा नाट्यसहवास’ या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव चौथ्या वर्षी आयोजित केला जात असून, नाट्यप्रेमींसाठी विविध नाटके, मुलाखती, परिसंवाद आणि अभिवाचनाचे कार्यक्रम यामध्ये होणार आहेत.

महोत्सवाचे उद्घाटन २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी एम.जी.एम. परिसरातील रुक्मिणी सभागृहात ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांच्या हस्ते होईल. यावेळी एम.जी.एम. विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि फाउंडेशनचे विश्वस्त नंदकिशोर कागलीवाल उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर ‘हॅनाची सुटकेस’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे.

यावर्षी प्रथमच ‘मिलिंद सफई पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून, रंगभूमीवर सातत्याने योगदान देणारे अभिनेते आणि लेखक योगेश शिरसाठ यांना हा सन्मान दिला जाणार आहे. याच दिवशी नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटनही होईल. विविध नामांकित प्रकाशनांच्या नाट्यसंहिता, आत्मचरित्रे आणि नाट्यसाहित्य रसिकांसाठी उपलब्ध असणार आहे.

२२ ऑगस्ट रोजी रत्ना पाठक शाह यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर ‘साहित्य ते नाटक : माध्यम रुपांतर’ या विषयावर परिसंवाद होईल. संध्याकाळी ‘सवाल-जवाब’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर ते भाष्य करणार आहे.

 

महोत्सवाच्या अंतिम दिवशी प्रा. अजित दळवी यांची प्रकट मुलाखत होईल. त्यानंतर ‘उमगलेले गांधी’ या अभिवाचन कार्यक्रमातून महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित निवडक लेखांचे सादरीकरण केले जाईल. या कार्यक्रमात रोहिणी हट्टंगडी, दीपक राजाध्यक्ष, चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर सहभागी होतील. संध्याकाळी ‘बरड’ या नाटकाच्या प्रयोगाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.

शहरात चित्रपट महोत्सवाप्रमाणेच ‘जिगीषा नाट्यसहवास’मुळेही सांस्कृतिक चळवळीला बळ मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले असून, अधिकाधिक नाट्यरसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40

मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांभोवती चौकशीचा फास? ईडीकडे पोहोचल्या तक्रारी

Thursday, 1 October 2026, 8:28

धरणांचा साठा घटला, आता पुण्यात पाणीकपात? सरकारने दिले नियोजनाचे आदेश

Thursday, 1 October 2026, 8:20

Maharashtra Weather: मान्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात 1 ऑक्टोबरला कुठे पाऊस, कुठे कोरडे वातावरण? वाचा

Thursday, 1 October 2026, 8:11

Daily Horoscope: चंद्राचा नक्षत्र बदल आणि हंस राजयोग; 1 ऑक्टोबरचे राशिभविष्य नेमकं काय सांगतं? वाचा

Thursday, 1 October 2026, 7:52

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

Wednesday, 30 September 2026, 23:23
Next Post

दोघांत तिसऱ्याची एंट्री झाली अन् पुण्यात खुनाचा थरार! गर्लफ्रेंडसमोरच तरुणानं बॉयफ्रेंडला संपवलं; पहा धक्कादायक VIDEO

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp