Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्या बॉयफ्रेंडसाठी तिनं संसार मोडला त्यानंच घात केला! प्रेमाच्या आणाभाका घेत शरीरसंबंध ठेवले अन् नंतर सत्य समोर येताच…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 June 2026, 15:06

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील सातारा परिसरात एका 24 वर्षीय महिलेची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहकाऱ्याशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून स्वतःचा संसार मोडला. आरोपीने तिच्या होणाऱ्या बाळाची जबाबदारी स्वीकारण्याचे, त्याला स्वतःचे नाव देण्याचे आणि तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या विश्वासाचा फायदा घेत त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. नंतर तो संपर्क तोडून बसला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात शाहिद कय्युम सय्यद (वय 27, रा. लक्ष्मी कॉलनी, शिवाजीनगर) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये क्रांतीचौक परिसरातील एका दुचाकी शोरूममध्ये काम करत असताना दोघांची ओळख झाली. काही दिवसांतच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्या वेळी महिला विवाहित होती आणि दोन महिन्यांची गर्भवती होती. प्रेमसंबंधामुळे तिच्या वैवाहिक आयुष्यात वाद वाढले आणि अखेर ती पतीपासून वेगळी राहू लागली.

फिर्यादीनुसार, महिला मैत्रिणीकडे राहत असताना आरोपीने तिचा आणि होणाऱ्या बाळाचा सांभाळ करण्याचे, मुलाला स्वतःचे नाव देण्याचे आणि लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर तिचा पतीशी अधिकृत घटस्फोट झाला आणि काही महिन्यांनी तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतरही आरोपी लग्नाचे आश्वासन देत तिच्याकडे येत राहिला आणि अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

मात्र काही दिवसांनी आरोपीने अचानक संपर्क तोडला. चौकशी केल्यानंतर तो स्वतःही विवाहित असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्याने ना तिची विचारपूस केली, ना तिच्या मुलीची जबाबदारी स्वीकारली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

व्हायरल झाल्यावरच जागे झाले प्रशासन! केरबा खोरे यांच्या अश्रूंनी उघडे पाडले सरकारी यंत्रणेचे अपयश……

Wednesday, 29 July 2026, 16:12

पुण्यातील भाजप आमदारांवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; प्रकरण थेट सरसंघचालकांकडे, अडचणी वाढणार?

Wednesday, 29 July 2026, 16:00

कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही पैसे मिळण्यात अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा? जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन

Wednesday, 29 July 2026, 15:49

पुण्यात आता भटक्या कुत्र्यांची जनगणना; पालिका खर्च करणार तब्बल ₹25 लाख!

Wednesday, 29 July 2026, 15:00

आईच्या कुशीत होतं दीड वर्षांचं लेकरू… मागून आला कंटेनर अन् एका धडकेत दोघांचा अंत; पुण्यात घडलं भयंकर

Wednesday, 29 July 2026, 15:00

पुणेकरांसाठी मोठा दिलासा! ताम्हिणी घाट गुरुवारपासून पुन्हा सुरू; पण ‘या’ वाहनांना परवानगी नाही

Wednesday, 29 July 2026, 14:31
Next Post

कानगाव येथे दहा हजारांच्या वादातून लोखंडी काठीने डोक्यात वार; उरुळी कांचन येथील एकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.