Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 29 September 2026, 16:08

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात कौटुंबिक वादातून सावत्र मुलाने वडिलांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. गेवराई शहरातील संजयनगर परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. गोळीबारात शेख मुसा हे जखमी झाले असून त्यांच्या गुडघ्याला गोळी लागली आहे. त्यांच्यावर गेवराई शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख मुसा यांचा त्यांच्या पहिल्या पत्नी आणि तिच्या मुलासोबत काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता. सोमवारी रात्री पहिल्या पत्नीच्या बाजूचे काही जण संजयनगर परिसरातील मुसा यांच्या घराजवळ आले. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या व्यक्तींमध्ये वाद आणि बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच हा वाद अधिक वाढला.

यावेळी मंगेश धुराजी शिंदे याने गावठी कट्टा काढून शेख मुसा यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. गोळी त्यांच्या गुडघ्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुसा यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी प्रकरणाची माहिती घेत तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या माहितीनुसार, या प्रकरणी पाच आरोपींविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

दरम्यान, गोळीबार केल्याचा आरोप असलेला मंगेश शिंदे घटनेनंतर फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या गावठी कट्ट्याबाबतही पोलीस तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या घटनेमागील इतर कारणे आणि सहभागी व्यक्तींची भूमिका याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19

यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 21 October 2026, 22:56

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45
Next Post

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp