बीड: बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Muder Case) यांच्या हत्येनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर (Beed News) बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर (Walmik Karad) प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मारहाणीचे आणि हिंसाचाराचे (Dhananjay Munde) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवर बीड ‘बिहार झाला’ अशा टीकाही करण्यात आल्या होत्या. (Latest Marathi News)

धनंजय मुंडेंवर आरोप
या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आल्यानंतर मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप झाले. या आरोपांनंतर त्यांच्यावर मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला. अखेर आरोग्याचे कारण देत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही मुंडे यांच्यावर थेट आरोप केले होते. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर धनंजय मुंडे यांनी जनतेच्या न्यायालयात आपण विजयी झालो असल्याचा दावा केला होता. (Santosh Deshmukh Beating)
वाल्मिक कराडला मोठा धक्का
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे. कराडने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो नामंजूर केला.
हत्या प्रकरणात कराड ‘मास्टरमाइंड’
मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, वाल्मिक कराडचा खंडणी, त्यानंतर संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे प्राथमिक पुराव्यांवरून स्पष्ट होते. कॉल डेटा रेकॉर्ड, मोबाईलवरील संभाषण, कराड आणि इतर आरोपींमधील सततचा संपर्क, जप्त केलेल्या व्हिडिओ क्लिप्स, आवाजाच्या नमुन्यांची सत्यता आणि प्रयोगशाळेतील अहवाल या सर्व पुराव्यांच्या आधारे कराडचा सहभाग दिसून येतो. त्यामुळे न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील न्यायालयीन कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







