Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बायकोकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग, बाईकवर बसवलं, बियर पाजली अन् केला गेम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 October 2025, 18:35
Nanded Crime: Angry at his wife for looking at him with evil eyes, he made her sit on a bike, poured beer and played a game

Photo-Social Media

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील (Nanded Crime) मुखेड तालुक्यात (Nanded News) थरारक घटना उघडकीस आली आहे. पत्नीवर वाईट नजरेने बघितल्याच्या संशयावरून एका 17 वर्षीय तरुणाचा खून करून प्रेत रस्त्याच्या कडेला टाकल्याचे समोर आले आहे. ही घटना दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी नायगाव पोलीसांनी आरोपीस अटक केली आहे.

मुखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील जिशान लतिफ सय्यद (वय 17) आणि त्याच गावातील आब्बास रमजानसाब शेख यांच्यात मोहर्रमच्या काळात भांडण झाले होते. त्यावेळी आब्बास याने जिशानवर त्याच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा आरोप केला होता. मात्र नातेवाईकांनी तो वाद मिटवला आणि दोघे पुन्हा मित्र झाले.

दि. 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता जिशान मस्जिदमध्ये नमाज अदा करून बाहेर पडला. त्यावेळी तो आब्बासच्या मोटारसायकलवर बसून गेला होता. गावातील काही जणांनी त्याला आब्बाससोबत पाहिले होते. रात्री 7.30 वाजता जावई रहिम महेबुब नांदेडे यांनी जिशानला फोन केला असता तो “मी पेट्रोल आणायला बाहेर आलो आहे, घरी गेल्यानंतर फोन करतो” असे म्हणून फोन ठेवला. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही.

घरच्यांनी जिशानचा शोध सुरू केला. वडिलांनी आब्बास याला फोन करून विचारले असता त्याने काहीच माहिती नसल्याचे सांगितले. मात्र त्याच्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे संशय वाढला. दुसऱ्या दिवशी (दि. 2 ऑक्टोबर) सकाळी मुखेड पोलिसांना माहिती मिळाली की, नायगाव तालुक्यातील गडगा-कौठा रोडवर एक प्रेत आढळले आहे. फोटो दाखवण्यात आला असता तो जिशानचाच असल्याचे नातेवाईकांनी ओळखले.

 

जिशानच्या डोक्यात दगडाने मारल्याचे, तर छातीत चाकूने भोसकल्याचे दिसून आले. शिवाय त्याच्या अंगावरील कपडे आणि पोटाचा भाग अर्धवट जाळलेला होता. म्हणजेच खुनानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे पोलिस तपासातून समोर आले. जिशानच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी आब्बास रमजानसाब शेख यास पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून इतर संशयितांचा सहभाग होता का याची चौकशी केली जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर मुखेड आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, एका किरकोळ संशयावरून जीव घेण्यापर्यंत प्रकरण गेले याबाबत ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ठाण्यात शिंदेसेनेला मोठा धक्का ! सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 13:18

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! सोसायटीच्या गेटवर नागरिकाला घेरलं अन् 2.60 लाख लंपास

Thursday, 10 September 2026, 12:30

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19
Next Post

Shocking News : आजी कुठे आहे..! सुनेचे दागिने घेऊन आजी प्रियकरासोबत फरार, आजीच्या धक्कादायक डावाने घर हादरलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp