Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘1 कोटी तयार ठेव, नाहीतर…’शेतकऱ्याचं दिवसाढवळ्या अपहरण; ‘त्या’ कॉलने पोलीसही चक्रावले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 December 2025, 12:43

Crime News: छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील बोदवड परिसरात एका शेतकऱ्याच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. तुझ्या वडिलांचे अपहरण झाले आहे, आम्ही सांगू तिथे 1 कोटी रुपये घेऊन ये, असा थरकाप उडवणारा फोन येताच शेतकऱ्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. Crime News

 

हेही वाचा- प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी का सोडली? रोहित पवारांकडे आहे ‘ते’ मोठं कारण, पण सांगायला नकार!

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम माधवराव गव्हाणे हे बोदवड येथील शेतकरी आहेत. शनिवारी 27 डिसेंबर रोजी सायंकाळी ते उंडणगाव येथे एका व्यापाऱ्याकडून मका विक्रीचे पैसे घेण्यासाठी गेले होते. काही रक्कम घेतल्यानंतर रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाले. मात्र उंडणगाव ते बोदवड या रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून अपहरण केल्याचा संशय आहे. त्यानंतर ते घरी परतले नाहीत.

रात्री उशिरापर्यंत वडील घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, ओळखीचे लोक आणि परिसरात चौकशी करूनही काही माहिती मिळाली नाही. अखेर अजिंठा पोलीस ठाण्यात तुकाराम गव्हाणे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार नोंदवल्यानंतर काही वेळातच मध्यरात्री सुमारे 12 वाजता मुलाच्या मोबाईलवर एक फोन आला. हा कॉल तुकाराम गव्हाणे यांच्या मोबाईलवरूनच करण्यात आला होता.

‘त्या’ एका कॉलने खळबळ

कॉल करणाऱ्या व्यक्तीने थेट अपहरण केल्याची कबुली देत आम्ही सांगू त्या ठिकाणी 1 कोटी रुपये घेऊन ये, अशी खंडणीची मागणी केली. या फोन कॉलमुळे कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने तपासासाठी सक्रिय झाले.

अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून, तांत्रिक तपासाच्या माध्यमातून कॉलचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील रस्ते, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास केला जात आहे. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यंत अपहृत शेतकरी किंवा संशयितांविषयी ठोस माहिती मिळालेली नव्हती. या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Pune Crime: पुण्यात कारागिराचा 'मास्टरप्लॅन', सराफाने सोपवलं सोनं, अन् त्याने केला गेम; पोलिसांनी टाकला तपासाचा फास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.