बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात (Crime News) एक धक्कादायक आणि खळबळजनक लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. सासरी राहणाऱ्या (Beed News) आणि दोन मुलांची आई असलेल्या (Kaij News) एका विधवा महिलेची सोशल मीडियावरून एका तरुणाशी ओळख झाली. या ओळखीतून पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले. संबंधित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी वारंवार सहमतीने शारीरिक संबंध ठेवले. मात्र, एके दिवशी तिच्या इच्छेविरुद्ध घरात घुसून बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावातील या महिलेचे सुमारे 13 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर तिला दोन मुले झाली. दरम्यान, 7 वर्षांपूर्वी एका अपघातात तिच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर ही महिला आपल्या दोन मुलांसह सासरी राहत होती आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.
सुमारे 2 वर्षांपूर्वी तिच्याच गावातील रमाकांत तांदळे नावाच्या 30 वर्षीय अविवाहित तरुणाशी तिची इंस्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. फिर्यादीत म्हटले आहे की, महिला एकटी व असहाय्य असल्याची जाणीव आरोपीला होती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत त्याने लग्नाचे खोटे आमिष दाखवत वेळोवेळी तिची फसवणूक केली आणि सहमतीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान, 14 ऑगस्ट 2025 रोजी आरोपीने या महिलेला अंधारात ठेवून दुसऱ्या तरुणीशी गुपचूप विवाह केला. लग्नानंतरही त्याने 31 डिसेंबर रोजी महिला घरात एकटी असताना घरात घुसून शरीरसुखाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने बळजबरीने आणि तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पीडित विधवेने केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी रमाकांत तांदळे याच्याविरोधात गु. र. नं. 6/2026 भा. न्या. सं. 64(1), 115(2), 333, 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके करत आहेत. आरोपी सध्या फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथके प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.







