Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपचारासाठी घाटीत आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर! मित्रांनीच भररस्त्यात मारलं; पडक्या इमारतीत नेत शरीराचे लचके तोडले अन्….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 20 September 2026, 17:35

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या घाटी रुग्णालयाच्या परिसरात उपचारासाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीला मारहाण करून जबरदस्तीने दुचाकीवरून नेल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन आरोपींना अटक केली. रोहन जगदिश रिडलॉन (वय २४, रा. मुंबई) आणि विशाल प्रकाश चावरिया (रा. घाटी क्वार्टर्स, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी मूळची वैजापूर परिसरातील आहे. १८ सप्टेंबरच्या रात्री रिक्षाने प्रवास करताना अचानक ब्रेक लागल्याने तिच्या उजव्या डोळ्याला रिक्षाच्या मीटरचा मार लागला होता. डोळ्याचा त्रास वाढल्याने ती १९ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास उपचारासाठी घाटी रुग्णालयात गेली. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी वॉर्ड क्रमांक १५ मधून वॉर्ड क्रमांक ११ मध्ये जाण्यास सांगितले.

वॉर्ड क्रमांक ११ कडे जात असताना विशाल चावरिया आणि रोहन रिडलॉन यांनी तिला रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने एसएसबी इमारतीजवळ नेले. तेथे तिच्यावर मारहाण करून जबरदस्तीने स्कूटरवर बसवल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार रुग्णालयातील एका वॉचमनसमोर घडल्याचेही तरुणीने पोलिसांना सांगितले.

त्यानंतर आरोपी तरुणीला एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेले. विशाल चावरिया खाली थांबला, तर रोहन रिडलॉन याने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर एका सतर्क नागरिकाने संशयास्पद प्रकाराची माहिती डायल ११२ वर दिली. माहिती मिळताच गस्तीवरील पोलिस काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच खाली थांबलेल्या विशालला ताब्यात घेण्यात आले आणि तरुणीची सुटका करण्यात आली.

दरम्यान, रोहन रिडलॉनने घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने प्रवासादरम्यान मोबाइल बंद केल्याचे तपासात समोर आले. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने त्याचा माग काढत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्कारालाही कुणी जाऊ नये!” संजय गायकवाडांच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार?

Thursday, 29 October 2026, 12:31

लोणीकंद येथे उधारीचे पैसे मागितल्याने तरुणाला लाथाबुक्क्या अन् पीव्हीसी पाइपने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Thursday, 29 October 2026, 12:15

माहेरून 1 लाख आणण्यासाठी छळ! पतीसह सासू-नणंदेविरोधात लोणीकंद पोलिसांत तक्रार दाखल; विवाहितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Thursday, 29 October 2026, 12:05

माथेरानच्या राणीचा पुन्हा शिट्टीचा नाद! शुक्रवारपासून मिनी ट्रेन धावणार; पाहा नवीन वेळापत्रक

Thursday, 29 October 2026, 12:02

पुण्यात घर घेण्याची शेवटची संधी! 2 दिवसांत अर्ज नाही केला तर संधी हुकणार; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 29 October 2026, 11:57

सोन्या-चांदीच्या दरात अचानक घसरण? भाव आणखी कमी होण्याची शक्यता

Thursday, 29 October 2026, 11:42
Next Post

'ऑपरेशन हनिमून' पाहून सियाने रचला खुनाचा कट! 'माही' नावाच्या फेक अकाऊंटवरून केतनला जाळ्यात ओढलं अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp