Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माहेरून 1 लाख आणण्यासाठी छळ! पतीसह सासू-नणंदेविरोधात लोणीकंद पोलिसांत तक्रार दाखल; विवाहितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 29 October 2026, 12:05

लोणीकंद, ता. 29 : माहेरून एक लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू आणि नणंदेविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पैशांची मागणी पूर्ण न केल्याने मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे.

याप्रकरणी पती नवीन उल्हास नागपुरे, सासू नुतन उल्हास नागपुरे आणि नणंद सोनाली सॅम्युअल यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारदार विवाहिता सध्या वाडेबोल्हाई येथे माहेरी राहत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी 2023 रोजी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह नोंदणी पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर सुरुवातीचे दोन ते तीन महिने सासरच्या मंडळींचे वागणे चांगले होते. लग्न ठरण्यापूर्वी नोकरी करण्यास परवानगी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र लग्नानंतर पतीने नोकरी करण्यास नकार दिला. कपड्यांवरूनही सासू टोमणे मारत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माहेरून एक लाख रुपये आणण्याची मागणी पतीने केली होती. विवाहितेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पती आणि सासूने शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.

26 मे 2023 रोजी माहेरच्या आई-वडिलांशी संबंध ठेवण्यावरून वाद झाला असता पुन्हा मारहाण करण्यात आली. पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पतीने आत्महत्येची धमकी दिल्याने आपण तक्रार न करताच घरी परतल्याचेही विवाहितेने नमूद केले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये विवाहितेला मुलगी झाली. मात्र, पती आणि सासूला मुलगा हवा असल्याने मुलगी झाल्यानंतर ते नाराज होते, असा आरोप तिने केला आहे. मुलगी आजारी पडल्यावर उपचारांसाठी तसेच तिच्या संगोपनासाठी लागणारा खर्च माहेरून आणण्यास सांगितले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, पतीला परदेशात जायचे असल्याने त्यासाठीही माहेरून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली जात होती. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पतीकडून शिवीगाळ व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. तसेच घरकाम आणि स्वयंपाकावरून नणंद व सासू टोमणे मारून अपमानित करत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मार्च 2023 ते जून 2026 या कालावधीत पती, सासू आणि नणंद यांनी संगनमताने पैशांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पाण्यासाठी एल्गार! उंडवडी सुप्यात बेमुदत उपोषण सुरू; शेतकऱ्यांच्या 6 प्रमुख मागण्या

Thursday, 29 October 2026, 12:45

“शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्कारालाही कुणी जाऊ नये!” संजय गायकवाडांच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार?

Thursday, 29 October 2026, 12:31

लोणीकंद येथे उधारीचे पैसे मागितल्याने तरुणाला लाथाबुक्क्या अन् पीव्हीसी पाइपने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Thursday, 29 October 2026, 12:15

माहेरून 1 लाख आणण्यासाठी छळ! पतीसह सासू-नणंदेविरोधात लोणीकंद पोलिसांत तक्रार दाखल; विवाहितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Thursday, 29 October 2026, 12:05

माथेरानच्या राणीचा पुन्हा शिट्टीचा नाद! शुक्रवारपासून मिनी ट्रेन धावणार; पाहा नवीन वेळापत्रक

Thursday, 29 October 2026, 12:02

पुण्यात घर घेण्याची शेवटची संधी! 2 दिवसांत अर्ज नाही केला तर संधी हुकणार; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 29 October 2026, 11:57
Next Post

लोणीकंद येथे उधारीचे पैसे मागितल्याने तरुणाला लाथाबुक्क्या अन् पीव्हीसी पाइपने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp