Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ऑपरेशन हनिमून’ पाहून सियाने रचला खुनाचा कट! ‘माही’ नावाच्या फेक अकाऊंटवरून केतनला जाळ्यात ओढलं अन्….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 20 September 2026, 18:13

पुणे : व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. २०२५ मध्ये चर्चेत आलेल्या ‘ऑपरेशन हनिमून’ प्रकरणाची माहिती आणि खुनाच्या घटनांवर आधारित चित्रपट पाहिल्यानंतर केतनला लोहगडावरील दरीत ढकलून ठार मारण्याचा कथित कट रचण्यात आल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, केतनची नियोजित वधू सिया गोयल, तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी आणि चेतनचा मित्र रितेश हंगे यांनी ‘माही’ नावाचे बनावट समाजमाध्यम खाते तयार केले होते. या खात्यावरून केतनशी संवाद साधताना ‘माही’ ही सियाची मैत्रीण असल्याचे भासवण्यात आल्याचा आरोप आहे. सियाचा वाढदिवस सरप्राइज पद्धतीने साजरा करण्याच्या बहाण्याने केतनला लोहगडावर बोलावण्यात आले आणि त्यानंतर कथित कटाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.

केतन अग्रवाल यांचा १८ जून रोजी लोहगडावरून दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला ही घटना अपघाती असल्याचे मानले जात होते. मात्र, पुढील तपासात हा अपघात नसून खून असल्याचा दावा पोलिसांनी केला. या प्रकरणी सिया (वय २०), चेतन (वय २२) आणि रितेश हंगे यांना अटक करण्यात आली आहे. तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

शनिवारी (ता. १९) वडगाव मावळ न्यायालयात पोलिसांनी ५ हजार ५३ पानी आरोपपत्र दाखल केले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल, सायबर आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

आरोपपत्रानुसार, आरोपींनी केतनचा खून करण्यासाठी २१ मे रोजी लोणावळ्यातील टायगर पॉइंटसह विविध दऱ्या-खोऱ्यांची पाहणी केली होती. मार्च २०२५ मध्ये लोहगडावरून पडून २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची माहितीही इंटरनेटवर शोधल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर १४ जून रोजी दोघे पुन्हा लोहगडावर गेले असता सियाने केतनला दरीत ढकलण्याचा कथित प्रयत्न केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. या प्रकरणातील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात गणेश विसर्जनाबाबत मोठा निर्णय! तब्बल १५० मंडळांना मुख्य मिरवणुकीत ‘नो एन्ट्री’

Monday, 21 September 2026, 22:08

कदमवाकवस्तीत पहाटेपर्यंत रंगला ‘होम मिनिस्टर’चा जल्लोष! महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध खेळ, मनोरंजन अन् आकर्षक बक्षिसांनी कार्यक्रमाची रंगत वाढली

Monday, 21 September 2026, 21:27

आधी गरोदर पत्नीची गळा चिरून हत्या केली नंतर स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार करत इमारतीवरून उडी मारली; हत्येचं धक्कादायक कारण समोर….

Monday, 21 September 2026, 21:04

‘माझ्या बहिणीची छेड काढतो का?’ जाब विचारायला गेला, डोकं सटकलं अन् हत्याराने गुप्त भागावर वार करत तरुणाचा खून

Monday, 21 September 2026, 20:01

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; न्यायालयात ‘चेन ऑफ कस्टडी’वर युक्तिवाद पूर्ण

Monday, 21 September 2026, 19:57

‘मी CBIचा अधिकारी आहे’ सांगत ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत १०० कोटींचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Monday, 21 September 2026, 19:14
Next Post

भारतीय महिलांचा गोलवर्षाव! उझबेकिस्तानवर १९-० विजय; दीपिका सेहरावतचे विक्रमी आठ गोल; इशिकाची हॅटट्रिक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp