Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकरी बापाचं लेकीला IAS बनवण्याचं स्वप्न! शहरात पाठवलं, होस्टेलवर ठेवलं अन् फोन बंद करून तरुणी अचानक गायब…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 August 2026, 16:26

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शेतकरी कुटुंबाने आपल्या मुलीला आयएएस अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी 20 वर्षीय मुलीला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. नूतन कॉलनीतील एका हॉस्टेलमध्ये राहून ती अभ्यास करत होती. मात्र, 25 मे 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. तब्बल 15 महिने उलटूनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही.

मुलीने 27 मे रोजी आई-वडिलांशी शेवटचा फोनवरून संपर्क साधला होता. त्यानंतर तिचा मोबाईल कायमचा बंद झाला. मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद क्रांती चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांसह कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

दरम्यान, मुलीचा शोध सुरू असताना तिच्या मैत्रिणीने एक महत्त्वाची माहिती दिली. रोहित राजपूत नावाचा तरुण आमिष दाखवून तिला सोबत घेऊन गेल्याचे मैत्रिणीकडून सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. मात्र, तो सातत्याने आपले ठिकाण बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागला नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

मुलगी नेमकी कुठे आहे, ती सुरक्षित आहे का, याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढत गेली. अखेर मुलीच्या वडिलांनी 25 सप्टेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान संशयित रोहित राजपूत आणि त्याचे काही नातेवाईक उपस्थित राहिले नाहीत. न्यायालयाच्या समन्सनंतरही संशयित फरार राहिल्याने कुटुंबीयांचा त्याच्यावरील संशय आणखी बळावला.

 

मुलीला फूस लावून घेऊन गेल्याचा संशय व्यक्त करत अखेर पालकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी रोहित राजपूत याच्याविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या 15 महिन्यांपासून लेकीच्या शोधात असलेल्या आई-वडिलांना आता ती कुठे आहे आणि तिच्यासोबत नेमके काय घडले, याची प्रतीक्षा आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15
Next Post

५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणे बंद! D-Mart ते Blinkit कडून खरेदीवर मर्यादा लागू; सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा फटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp