Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 October 2026, 19:24

विशाल शिंदे

चांदे (ता. मुळशी), दि. ३ : गुंजवणी प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या भोर व राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय झाला आहे. गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित जल नियोजनात १ हजार ९३०.६१ हेक्टर नव्या क्षेत्राचा समावेश करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, वांगणी, वाजेघर व शिवगंगा खोऱ्यातील तीन उपसा सिंचन योजनांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या योजनांच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.

चांदे येथील आमदार मांडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रम खुटवड, राजगड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत, माजी सदस्य चंद्रकांत बाठे, भोर पंचायत समितीचे उपसभापती विशाल कोंडे, राजगड पंचायत समितीचे सदस्य संदीप खुटवड व मुळशी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबाजी शेळके उपस्थित होते.

मांडेकर म्हणाले की, गुंजवणी प्रकल्पांतर्गत धानेप येथील कानंदी नदीवरील धरणाचे काम पूर्ण झाले आहे. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ३.६९७ टीएमसी असून, सुधारित जल नियोजनानुसार भोर, राजगड व पुरंदर तालुक्यातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. यापूर्वी प्रस्तावित २१ हजार ३९४ हेक्टर क्षेत्रासोबत आता १,९३०.६१ हेक्टर क्षेत्र नव्याने समाविष्ट झाल्याने एकूण २३ हजार ३२४.६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

 

नव्याने समाविष्ट क्षेत्रामध्ये शिवगंगा खोरे ९७०.५३ हेक्टर, वांगणी खोरे ५१०.०८ हेक्टर आणि वाजेघर खोरे ४५०.०८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

या वंचित क्षेत्रासाठी स्वतंत्र उपसा सिंचन योजना मंजूर व्हावी, यासाठी अनेक वर्षांपासून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळ तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा प्रश्न मांडण्यात आला. त्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला. शासनाने फेरजल नियोजनास मान्यता दिल्याने पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे.

गुंजवणी प्रकल्पातील पाणी नियोजनात सिंचनासाठी ३.५४ टीएमसी, पिण्याच्या पाण्यासाठी ०.४३ टीएमसी, तर बाष्पीभवन व इतर कारणांसाठी ०.२० टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सुधारित जल नियोजनामुळे भोर व राजगड तालुक्यातील पाण्यापासून वंचित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शेती उत्पादनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विजय शिवतारे यांचे योगदान असल्याचे आमदार मांडेकर यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp