Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकरी नुकसान भरपाईच्या नियमांत मोठा बदल; पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही अनिवार्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 29 September 2026, 18:03

पुणे : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्याबाबत कृषी विभागाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यभरात सध्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू असून, प्रत्येक पंचनामा पूर्ण केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयाने याबाबत राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून, त्यासाठी स्वतंत्र प्रपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 265 तालुक्यांमध्ये पंचनामा करताना प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आयडी म्हणजेच ॲग्री स्टॅक कार्ड क्रमांक नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध नसेल, अशा शेतकऱ्यांसाठी आधार क्रमांक ग्राह्य धरला जाणार आहे. पंचनामा अहवाल संबंधित विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून लवकरात लवकर कृषी आयुक्तालयाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कृषी विभागाने तयार केलेल्या प्रपत्रामध्ये शेतकऱ्याचे नाव, बाधित पीक, पिकाच्या नुकसानीची टक्केवारी, फार्मर आयडी किंवा आधार क्रमांक तसेच शेतकऱ्याच्या बँक खात्याची माहिती नोंदविण्यात येणार आहे. या सर्व नोंदी केल्यानंतर पंचनामा पूर्ण झाल्याबाबत शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे करण्यात येत होते. मात्र पंचनाम्याच्या प्रक्रियेवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप होत होते. काही ठिकाणी अधिकारी प्रत्यक्ष शेतावर न जाता एका ठिकाणी बसून पंचनामे करत असल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे यंदा शेतकऱ्याची स्वाक्षरी बंधनकारक करण्याच्या निर्णयामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकरी नुकसान भरपाईच्या नियमांत मोठा बदल; पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही अनिवार्य

Tuesday, 29 September 2026, 18:03

ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद! तुमच्या राज्यात किती दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Tuesday, 29 September 2026, 17:57

मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; वाचा सविस्तर

Tuesday, 29 September 2026, 17:19

सचिन वाझेंना दिलासा! मनसुख हिरेन हत्या अन् अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटी शर्थीसह जामीन मंजूर

Tuesday, 29 September 2026, 17:18

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा! सोशल मीडिया अन् Google Searchवरून रचला कट; चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर

Tuesday, 29 September 2026, 16:55

लोणी काळभोर सोसायटीची 109 वी सर्वसाधारण सभा उत्साहात

Tuesday, 29 September 2026, 16:51
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp