Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Leopards Death : 5 वर्षांत 675 बिबट्यांचा अंत; रस्ते अपघातात 198 बिबट्यांनी गमावला जीव; वन विभागाची आकडेवारी उघड.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 March 2026, 12:15
Leopards Death

photo- social media

Leopards Death : महाराष्ट्रात मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या 5 वर्षांत राज्यात तब्बल 675 बिबट्यांचा मृत्यू झाला असून, नैसर्गिक कारणे, रस्ते अपघात, विहिरीत पडणे, विजेचा धक्का आणि शिकारी ही त्यामागची प्रमुख कारणे असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत राज्यात 187 वाघांचा मृत्यू झाला असून, बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाघांच्या तुलनेत जवळपास 3 पट अधिक आहे.  (Leopards Death)

 

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वन विभागाकडून मागवलेल्या माहितीतून ही आकडेवारी उघड झाली आहे. त्यानुसार राज्यात बिबट्यांचे सर्वाधिक मृत्यू पुणे वन विभागात 181 इतके नोंदवले गेले आहेत. त्यानंतर नाशिक विभागात 161 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

वर्षनिहाय आकडेवारी पाहिली तर 2021 मध्ये 167, 2022 मध्ये 140, 2023 मध्ये 77, 2024 मध्ये 144, 2025 मध्ये 137, तर 2026 च्या जानेवारीअखेरपर्यंत 10 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंपैकी 320 मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे, तर 198 बिबटे रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडले. याशिवाय 17 बिबटे शिकारीत, तर 12 बिबटे विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे.

मानव-वन्यजीव संघर्षाचे सर्वाधिक उदाहरण पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात दिसून आले. 2025 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यांत 5 जणांचा मृत्यू झाला होता. संघर्ष नियंत्रणासाठी वन विभागाने त्याच वर्षी 68 बिबट्यांना जेरबंद केले. मात्र माणिकडोह येथील बचाव केंद्र पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे 50 बिबट्यांना गुजरातमधील ‘वनतारा’ प्रकल्पात हलवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

तज्ज्ञांच्या मते, वनक्षेत्राचे तुकडे होणे, जंगलांना जोडणारे वनपट्टे कमी होणे आणि दुर्गम भागातही रस्त्यांचे जाळे वाढणे ही परिस्थिती गंभीर बनवत आहे. अन्न, पाणी किंवा जोडीदाराच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्यांना अनेकदा रस्ते ओलांडावे लागतात. वाहनांचा वाढलेला वेग आणि रात्रीची वाहतूक यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे.

याशिवाय शेतांमधील उघड्या विहिरी आणि कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेच्या तारा हेही वन्यप्राण्यांसाठी प्राणघातक ठरत आहेत. त्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी रस्त्यांवर वेग मर्यादा पाळणे, विहिरींना सुरक्षित जाळी लावणे आणि जंगलांच्या जोडणाऱ्या मार्गांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

फावड्याशेठ, पांढरे कपडे घातले म्हणून काळा पैसा पांढरा होत नाही"; पुण्यात बॅनरबाजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.