Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंबेनळी घाटातील 8 जणांच्या मृत्यूत सर्वात मोठा धक्कादायक ट्विस्ट! अपघात शनिवारी रात्रीच झाला; 24 तास पोलीस अन् यंत्रणा अंधारात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 25 May 2026, 16:22

रायगड: रायगडच्या आंबेनळी घाटातील दाभिळ टोक परिसरात झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ कार तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या अपघाताबाबत समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात घडल्यानंतर जवळपास 24 तास कोणालाच त्याची माहिती नव्हती. रात्रीच्या अंधारात गाडी दरीत कोसळल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. अखेर तरुण घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. (Raigad Accident Ambenali Ghat)

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील काही तरुण मित्रांसह हर्णे येथे फिरण्यासाठी गेले होते. शनिवारी रात्री ते जेवण करून साताऱ्याकडे परत निघाले. मात्र रविवारी सकाळपर्यंत ते घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधत शोधमोहीम सुरू केली.

पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला असता, तरुणांचे शेवटचे लोकेशन पोलादपूर आणि आंबेनळी घाट परिसरात आढळले. त्यानंतर दरीत शोधमोहीम राबवण्यात आली. सुरुवातीला एका जुन्या अपघातातील वाहन दिसल्याने गोंधळ उडाला. मात्र पुढील तपासणीत खोल दरीत स्कॉर्पिओ कार कोसळल्याचे स्पष्ट झाले.

 

अपघात इतका भीषण होता की कारमधील सर्व 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. रात्री अंधार आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले नाही. सोमवारी सकाळी ट्रेकर्स आणि बचाव पथकाने दोरी व स्ट्रेचरच्या सहाय्याने मृतदेह वर आणले.

या घटनेमुळे आंबेनळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच अपघातानंतर तब्बल 24 तास हा प्रकार लक्षात न आल्याने पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या प्रतिसादाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35

पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

Thursday, 2 July 2026, 18:10

दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Thursday, 2 July 2026, 17:30
Next Post

प्रशासनाचा ढिसाळ कारभार! खेड शिवापूर टोलपाशी बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांचा धोका; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.