Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा सन्मान; जयंतीदिनी साजरा होणार ‘राज्य ॲग्रीकॉस कृषि विद्यार्थी दिन’

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 23 October 2026, 13:29

मुंबई : महाराष्ट्र सरकारने कृषी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे पहिले कृषिमंत्री आणि शेतकऱ्यांचे नेते डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 27 डिसेंबर हा दिवस आता ‘राज्य ॲग्रीकॉस कृषि विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 22 ऑक्टोबर 2026 रोजी जारी करण्यात आला आहे.

कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना, कृषी पदवीधरांना, संशोधकांना आणि तरुणांना प्रेरणा मिळावी, तसेच या क्षेत्रातील शिक्षण व संशोधनाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णयाद्वारे या दिवसाची घोषणा केली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. कृषी शिक्षणाला चालना देणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. देशात कृषी विद्यापीठांची संकल्पना पुढे आणण्यामध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. याशिवाय भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुनर्गठनाशी संबंधित कामात त्यांनी योगदान दिले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करताना त्यांनी 1955 मध्ये ‘भारत कृषक समाज’ या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या या कार्यामुळे कृषी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि शेतकरी संघटनांना दिशा मिळाली.

 

राज्य सरकारच्या निर्णयामुळे दरवर्षी 27 डिसेंबरला कृषी विद्यार्थ्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्याची संधी मिळणार आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे शिक्षक मतदारसंघात पैशांचा खेळ? प्रत्येक शिक्षकाला ₹10 हजार वाटल्याचा आरोप; निवडणुकीत खळबळ!

Friday, 23 October 2026, 13:43

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा सन्मान; जयंतीदिनी साजरा होणार ‘राज्य ॲग्रीकॉस कृषि विद्यार्थी दिन’

Friday, 23 October 2026, 13:29

महापौर कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी! मेलमध्ये हल्ल्याची तारीख अन् ग्रेनेड कुठे टाकणार, याचाही उल्लेख

Friday, 23 October 2026, 13:20

फार्मर आयडी नसेल तर अडचण येणार? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

Friday, 23 October 2026, 13:10

एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ आढळली तर अधिकाऱ्यांची खैर नाही; प्रताप सरनाईकांचा इशारा

Friday, 23 October 2026, 13:02

जरांगेंचा ‘500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब’! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अडीच वर्षांनंतर हे…”

Friday, 23 October 2026, 12:41
Next Post

पुणे शिक्षक मतदारसंघात पैशांचा खेळ? प्रत्येक शिक्षकाला ₹10 हजार वाटल्याचा आरोप; निवडणुकीत खळबळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp