Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना; पंढरपुरात असणार मुख्यालय..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 14 July 2024, 20:01

मुंबई :  महाराष्ट्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे. या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवतील अधिकारीची व्यवस्थापकिय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे.

 

मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्य सरकारकडून याबाबत आज अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

शासन निर्णयात काय..

महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या महामंडळामार्फत पुढील योजना लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

१. महामंडळाची रचना :

१.१. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल.
१.२. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील
अधिकाऱ्यांची “व्यवस्थापकीय संचालक” म्हणून नियुक्ती करण्यात येईल. १.३. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भागभांडवल रू.५० कोटी इतके असेल.

२. प्रस्तावित महामंडळाचे कार्य :-

शेकडो वर्षांपासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून “वारी” करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे. सर्व तिर्थक्षेत्रांचा विकास, किर्तनकार व वारकऱ्यांना अन्न, निवारा, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा इ. सोयी-सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या महामंडळामार्फत वारकरी, किर्तनकार, तीर्थक्षेत्रांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याबाबत कार्य करण्यात येईल.

३. महामंडळाच्या प्रस्तावित योजनाः-

३.१. महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी, प्रश्न सोडवणे.
३.२. सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा करणे, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करुन नियोजन करण्यात येईल.
३.३. आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
३.४. वारकरी भजनी मंडळाला भजन व किर्तन साहित्याकरिता (टाळ, मृदंग, विणा, इ.) अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
३.५. किर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना राबविण्यात येईल.
३.६. आषाढी व कार्तिकी वारीसाठी दिंड्याना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
३.७. पंढरपुर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदीर, अरण ता. माढा जि. सोलापूर व इतरही तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल.
३.८. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषण मुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
३.९. परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृध्दापकाळामध्ये “वारकरी पेंशन” योजना सुरु करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. ३.१०. संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे ‘पूज्य सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी’ या संस्थेत विद्यार्थ्यांना फी नाही व शिक्षकांना वेतन नाही आणि कोणतेही शासकीय अनुदान नाही. या व अशा इतर संस्थांना किर्तनभवन, शिक्षण वर्ग, भजन हॉल या विकासकामांकरिता भरीव निधी देण्याबाबतची कार्यवाही महामंडळाकडून करण्यात येईल .
३.११ संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर, ता.जि. उस्मानाबाद (धाराशिव) येथे १५ हजार स्केअर फुटाचा सभामंडपासाठी निधी मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
३.१२ श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर पालखी मार्ग व समाधी स्थळ याकरिता मंजूर झालेल्या निधीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.
३.१३ श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
३.१४ श्री क्षेत्र पंढरपूर येथे म्हसोबा मंदिर ते विप्रदत्त घाटापर्यंत चंद्रभागेवरती पादचारी मार्ग अथवा झुलता पूल तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
३.१५ श्री क्षेत्र पंढरपूर येथील ६५ एकरमध्ये काँक्रीटीकरण व दिंड्यांसाठी मोठे वेगवेगळे कक्ष उभारावे, त्यास नाममात्र शुल्क आकारण्यात यावेत. या जागेव्यतिरिक्त पालख्या / वाऱ्यांच्या पंढरपूरकडे येणा-या सर्व मार्गांवर पंढरपूर शहराजवळ वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी, फडांसाठी तसेच त्यांच्या सोयीसुविधांसाठी भूसंपादन करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
३.१६ सर्व पालखी सोहळ्यांचे मार्ग व्यवस्थित करुन प्रतिवर्षी त्याकरिता सर्व व्यवस्था करण्याकरिता कायमस्वरुपी निधी मंजूर करण्यात येईल.
३.१७ आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकरी/भाविक तसेच दिंडींच्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
३.१८ महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, प्रसाधन गृहे, वस्त्रांतर व इतर अनुषंगिक सोयी सुविधा पुरविण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

४. महामंडळाकरीता आवश्यक पदे (आकृतीबंध) व आर्थिक तरतूद, स्वतंत्र लेखाशिर्ष याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्वतंत्ररित्या कार्यवाही करण्यात येईल. सद्यः स्थितीत महामंडळ कार्यान्वित करण्याचा खर्च विभागाच्या ज्येष्ठ नागरिक योजनांच्या लेखाशिर्षामधून करण्यात येईल. महामंडळाची कार्य नियमावली आणि तद्अनुषंगिक इतर आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येतील.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

Wednesday, 1 April 2026, 19:40
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27
Next Post

मुख्याध्यापक महामंडळाच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी रामराव पाडुळे यांची बिनविरोध निवड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.