Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रासाठी ३० लाख घरकुलांचे उद्दिष्ट; प्रत्येकाला मिळणार हक्काचे घर!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 4 June 2025, 12:35

 

पुणे: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यासाठी तब्बल ३० लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले असून, यामार्फत सुमारे ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हे अभियान राबवून महाराष्ट्र हे देशातील पहिले “घरकुल युक्त राज्य” होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बालेवाडी, पुणे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात आयोजित प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या योजनेचा लाभ प्रामुख्याने ग्रामीण भागातील बेघर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मिळणार आहे. आतापर्यंत ‘आवास प्लस’ अंतर्गत ३० लाख कुटुंबांची नोंद करण्यात आली असून, यातील २० लाख घरकुलांना केंद्राने मंजूरी दिली आहे. यापैकी १० लाख घरांचा पहिला हप्ता वितरित झाला आहे. उर्वरित १० लाख घरांसाठी केंद्राकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे.

 

मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा

पूर्वी फक्त अति गरजू कुटुंबांसाठी ही योजना होती, परंतु आता यामध्ये १५,००० रुपये मासिक उत्पन्न असलेली कुटुंबे, दुचाकी वाहनधारक, २.५ एकर बागायती किंवा ५ एकर जिरायती शेतजमीन असलेले, आणि काही प्रमाणात संपत्ती असलेले ग्रामीण मध्यमवर्गीय देखील या योजनेस पात्र ठरू शकतात. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना घर मिळवण्यासाठी याचा मोठा आधार मिळणार आहे.

योजनेसोबत मिळणाऱ्या सुविधा

प्रधानमंत्री आवास योजनेत केवळ घरच नव्हे, तर त्या घरासोबत जीवन जगण्यास आवश्यक सर्व मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. जसे की वीज कनेक्शन, शुद्ध पाणीपुरवठा, शौचालय, रस्ता, गॅस कनेक्शन, आणि मनरेगाच्या माध्यमातून स्थानिक रोजगाराची हमी. त्यामुळे घर केवळ निवारा न राहता, एक सुसज्ज आणि राहण्यासाठी सुरक्षित जागा बनणार आहे.

राज्य शासनाने योजनेतील लाभार्थ्यांना अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. प्रत्येक घरकुलासाठी ५०,००० रुपये अतिरिक्त अनुदान आणि ‘दीनदयाल उपाध्याय घर खरेदी अर्थसहाय्य योजना’ अंतर्गत १ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यामुळे घरकुल उभारणीचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण ही केवळ घर बांधण्याची योजना नसून ती एक जीवनमान उंचावणारी सर्वसमावेशक योजना आहे. यामार्फत गरिबांसोबतच ग्रामीण मध्यमवर्गीय कुटुंबांनाही स्थैर्य, सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळणार आहे. ही योजना महाराष्ट्रात ग्रामीण परिवर्तनाचे नवीन पर्व सुरू करत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13

मुंबईसह राज्यभरात पावसाचा मोठा इशारा! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

Thursday, 10 September 2026, 23:01

ब्रिटनच्या संसदेत घुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Thursday, 10 September 2026, 22:50
Next Post

पुण्यात पावसाचा जोर वाढला, अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp