Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

HSRP नंबरप्लेटसाठी आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत; लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 17 August 2025, 13:07

मुंबई: राज्यातील वाहनधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP (High Security Registration Plate) नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ अनेक कारणांमुळे देण्यात आली आहे. HSRP बसवण्याच्या प्रक्रियेतील विलंब, केंद्रांवरील अपॉइंटमेंट मिळण्यास होणारा उशीर आणि नागरिकांच्या सततच्या मागण्या, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता वाहनधारकांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही प्लेट बसवता येईल. यापूर्वीची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 होती.

 

मुदत संपल्यावर कठोर कारवाईचा इशारा

“1 डिसेंबर 2025 पासून HSRP नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. ज्या वाहन मालकांनी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉइंटमेंट बुक केली असेल, त्यांना कारवाईतून सूट मिळेल”राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी ही माहिती दिली आहे.

निर्बंध आणखी कडक

HSRP प्लेट्स नसलेल्या वाहनांसाठी सध्या मालकी हस्तांतरण आणि गहाणखत बदल यांसारख्या सेवा बंद आहेत. 1 डिसेंबर 2025 पासून पुनर्नोदणी आणि परवाना नूतनीकरण यांसारख्या सेवांवरही बंदी येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी या मुदतीपूर्वी HSRP बसवणे बंधनकारक आहे. तपासणीमध्ये सापडलेली वाहने एचएसआरपी प्लेट बसवल्याशिवाय सोडली जाणार नाहीत, असाही इशारा देण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

हॉटेलमध्ये जेवण केलं अन् बिल मागताच घडलं भयंकर कांड; नेमकं प्रकरण 'काय'? वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.