Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात ‘या’ तारखेपासून कापूस खरेदीस सुरुवात; 150 हून अधिक केंद्र सुरु, ‘सीसीआय’च्या अध्यक्षांची माहिती 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 30 August 2025, 12:58

मुंबई: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.  भारतीय कापूस महामंडळ (CCI) यंदा देशभरात सुमारे  550 खरेदी केंद्रांद्वारे कापूस खरेदी करणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 150 पेक्षा अधिक केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात अधिकृत खरेदीस  15 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती ‘सीसीआय’चे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली.

 

आयात शुल्क हटविल्यामुळे बाजारभावात दबाव

केंद्र सरकारने कापड उद्योगाच्या मागणीनुसार, कापसावरील  11  टक्के आयात शुल्क 31 डिसेंबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कापसाची आयात वाढण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे देशांतर्गत बाजारभाव घसरण्याची शक्यता आहे. यामुळे हमीभाव असतानाही बाजारातील कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी होऊ शकतात. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

हमीभाव, नोंदणी आणि अपेक्षित आवक

यंदा केंद्र सरकारने कापसासाठी प्रती क्विंटल 8110 इतका हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, आयात खुली केल्यामुळे शेतकऱ्यांचा कल सरकारी खरेदीकडे वाढण्याची शक्यता आहे. मागील हंगामात सीसीआयने  25 लाख क्विंटल कापूस खरेदी केला होता. यावर्षी ही खरेदी त्यापेक्षा जास्त होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

सीसीआय मार्फत खरेदीसाठी शेतकऱ्यांना ‘कपास किसान’ मोबाईल अ‍ॅपवर 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीनंतर दिलेल्या सात दिवसांच्या कालावधीत शेतकरी कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही केंद्रावर कापूस विक्री करू शकतात.

राज्यातील उत्पादनाचा अंदाज

यंदा महाराष्ट्रात 38.35 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली असून, सरासरी 10 क्विंटल उत्पादन गृहित धरल्यास सुमारे  400 लाख क्विंटल ( 80 लाख गाठी) कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. यामुळे राज्यभरात 150 हून अधिक कापूस खरेदी केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ओलावा मर्यादेवर शेतकऱ्यांची मागणी

सध्या खरेदीवेळी 8 ते 12 टक्के ओलावा मान्य असून, या मर्यादेत सुमारे 324 प्रती क्विंटल कपात केली जाते. मात्र अनेकवेळा कापसातील ओलावा 12 टक्क्यांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे ही मर्यादा 15 टक्क्यांपर्यंत वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कापसावरील आयात शुल्क हटविल्यामुळे बाजारभाव कमी राहण्याची शक्यता असली तरी हमीभाव आणि सरकारी खरेदीची प्रक्रिया पाहता शेतकऱ्यांचा कल सीसीआय खरेदीकडे अधिक राहील.  15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या खरेदी प्रक्रियेत विक्रमी आवक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

'आदर्श गणपती उत्सव' हा समाजाला जगण्यासाठी नवी दिशा देईल; वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.