Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 25 September 2023, 17:56

Big News : मुंबई : सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. यामुळे या प्रकरणाचा निकाल एक ते दोन आठवड्यात लागेल, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एकदा हा निकाल लांबणीवर पडल्याने याचे राजकीय पडसाद कशा पद्धतीने उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून वारंवार केली जात होती. मात्र, आता या प्रकरणाचा निकाल याच वर्षी लागणे कठीण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राहुल नार्वेकर यांनी आज तातडीने सुनावणी बोलावली. (Big News) विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

निकाल यावर्षी येणे कठीण

दरम्यान, या सुनावणीनंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल यावर्षी येणे कठीण आहे, ही बाब स्पष्ट होत आहे. संभाव्य वेळापत्रकात उलट तपासणीचा समावेश आहे. या प्रक्रियेला किमान ३ महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल डिसेंबरपर्यंत लागणे अवघड आहे. तीन महिन्यांनंतर हे प्रकरण निकालात लागण्याची शक्यता आहे. (Big News) दोन्ही गटाकडून पक्षाची महत्त्वाची कागदपत्रे आणि घटना जमा केली आहे. त्यामुळे त्या कागदपत्रांची पडताळणी, आमदारांची साक्ष आणि उलट तपासणी ही सुनावणीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या प्रत्यक्ष सुनावनीनंतर तातडीने निर्णय देणे कठीण आहे.

 

दरम्यान, सुप्रीम कोर्टात या प्रकरणी दोन आठवड्यानंतर सुनावणी आहे. या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टात अहवाल द्यावा लागणार आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई केली, आमदारांची साक्ष कशा प्रकारे नोंदवण्यात आली, या विषयीचा अहवाल विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टात सादर करतील. याच प्रकरणी दोन आठवड्यांत सुप्रीम कोर्टातही सुनावणी पार पडणार आहे. (Big News) त्यामुळे आगामी काळात काय-काय घडतं, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : यवत पोलिस ठाण्याचे ‘स्टाईल आयकॉन’ पोलिस हवालदार संदीप कदम अपघातात गंभीर जखमी ; संदीप कदम यांचा अपघात की घडवून आणलेला…? पोलिस खात्यातच दबक्या आवाजात चर्चा सुरु, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

Big News : चोरी यशस्वी झाली, पण एका पाण्याच्या बाटलीने घोळ केला अन् राजगड पोलिसांच्या ताब्यात सापडला

Big News : महसूल विभागाचा दणका ! चार उपजिल्हाधिकाऱ्यांसह 11 अधिकाऱ्यांना थेट निलंबितच केलं

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26
Next Post

Pune News : शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवरायांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारणार; शरद सोनवणे यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.