Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MahaDBT कडून ‘अंतिम’ इशारा! 9 जानेवारीपर्यंत ‘हे’ काम करा, नाहीतर हातात आलेलं अनुदान जाणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 January 2026, 15:56

Agriculture News : मुंबई : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल संदर्भात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी महाडीबीटी पोर्टलवर पूर्व संमती देण्याचा पर्याय बंद करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र आता शासनाने याबाबत स्पष्ट माहिती दिली असून, ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे, अशा शेतकऱ्यांचे अर्ज पूर्व संमती देऊन विचारात घेतले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना 9 जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

 

हेही वाचा- पुण्यात अजितदादांचा ‘मास्टर प्लॅन’; खास समर्थकाच्या एन्ट्रीने बिडकर-धंगेकर लढत पुन्हा पेटली; धंगेकरांची यंत्रणा सांभाळणारे नवथरे आता ‘दादां’चे उमेदवार

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलद्वारे मागील सहा महिन्यांत सोडतीत निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही अनेक शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. त्यामुळे त्यांचे अर्ज शेतकरी स्तरावर प्रलंबित स्थितीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, 9 जानेवारीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्यास संबंधित अर्ज आपोआप रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनुदानाचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी वेळेत सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे अर्ज कायमस्वरूपी रद्द होतील.

शासनाने असेही स्पष्ट केले आहे की, जे शेतकरी वेळेत कागदपत्रे अपलोड करून पूर्व संमती मिळवतील, त्यांचे अर्ज नंतर कोणत्याही कारणामुळे रद्द होणार नाहीत. त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

अनुदान योजनांसाठी कागदपत्रांच्या बाबतीत काही सुलभता करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना सातबारा उतारा, आठ-अ उतारा, गाव-शिवाराचा पत्ता, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक स्वतंत्रपणे सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र, यांत्रिकीकरणाशी संबंधित योजनांसाठी दरपत्रक देणे बंधनकारक आहे. तसेच फलोत्पादनाशी संबंधित योजनांसाठी प्राकलन सादर करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे न दिल्यास संगणकीय प्रणालीद्वारे सात दिवसांनंतर अर्ज आपोआप रद्द केले जाणार आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17

हास्यजत्रा फेम गौरव मोरेने चाहत्यांना एकाच वेळी दिल्या दोन आनंदाच्या बातम्या; नेमकं गुपित काय?

Monday, 6 April 2026, 13:41

नांदेडचा ‘बिहार’ झालाय का? 48 तासांत 5 जणांची हत्या; शिंदे गटाच्या नेत्याची दिवसाढवळ्या कत्तल

Monday, 6 April 2026, 13:24
Next Post

Pune News: उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अभिजीत तांबिले यांचे कृषीमंत्र्यांना सविस्तर निवेदन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.