Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अभिजीत तांबिले यांचे कृषीमंत्र्यांना सविस्तर निवेदन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 January 2026, 16:16

आदित्य बोराटे

 

पुणे: इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव , कांदलगाव, तरडगाव या (Pune News) गावातील उजनी धरण प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मूळ मालक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या (Indapur News) हक्कांचे संरक्षण व्हावे आणि वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फुटावी, या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभिजीत राजेंद्र तांबिले यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन लेखी निवेदन देण्यात आले. (Marathi News)

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १९७० च्या दशकात उजनी धरण प्रकल्पासाठी इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव , कांदलगाव, तरडगाव अशा गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी माती-मुरूम उचलण्यासाठी शासनाने संपादित केल्या. त्या वेळी शेतकऱ्यांनी मोठ्या त्यागातून शेती दिली. मात्र नंतरच्या काळात विविध धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीतील त्रुटींमुळे मूळ जमीनमालक शेतकऱ्यांचे हक्क बाधित झाले आहेत.

अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने पाणीपट्टी भरून शेती विकसित केली असूनही आज त्यांना जमिनीच्या मालकी व वहिवाटीबाबत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेक कुटुंबांची उपजीविका धोक्यात आली असून हा प्रश्न केवळ कायदेशीर नसून सामाजिक आणि मानवी दृष्टीनेही अत्यंत गंभीर असल्याचे तांबिले यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे.

निवेदनात अभिजीत तांबिले यांनी स्पष्ट केले की, “तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या बाजूने सहानुभूतीपूर्वक विचार करून वहिवाटीचे आदेश दिले होते. आता पुन्हा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करून ठोस मार्ग काढणे आवश्यक आहे.”

या संदर्भात शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, उजनी प्रकल्पग्रस्त ३ गावांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पुनर्विचार करून २००० एकर जमिनीच्या मूळ जमीनमालकांचे हक्क सुरक्षित करावेत, अशी ठाम मागणी तांबिले यांनी केली आहे. या निवेदनासोबत संबंधित शेतकऱ्यांच्या सह्यांची यादीही जोडण्यात आली आहे.

कृषी मंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन शासनस्तरावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे तांबिले यांनी सांगितले. उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा प्रश्न लावून धरणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

उरुळी कांचन येथील ग्रामस्वच्छता ग्रुपच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदात्यांचा "रेकोर्डब्रेक" प्रतिसाद ; 945 रक्तदात्यांनी केले रक्तदान, 41 महिलांचा समावेश तर 253 युवकांचे पहिल्यांदाच रक्तदान..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.