पुणे: यंदाच्या पुणे महानगरपालिका (Pune Election) निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मध्ये पुन्हा एकदा बीडकर–धंगेकर लढत पाहायला मिळणार आहे. 2017 च्या (Pune Mahapalika Election) नगरसेवक निवडणुकीत रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपचे गणेश बीडकर (Ganesh Bidkar) यांचा पराभव केला होता. यावेळी मात्र थेट रविंद्र धंगेकर न लढता त्यांचे पुत्र प्रणव धंगेकर (Pranav Dhangekar) मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या समोर पुन्हा (Ajit Pawar) एकदा गणेश बीडकरांचे आव्हान असणार आहे. मात्र याच प्रभागात आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिसरा उमेदवार उतरल्याने लढत तिरंगी होणार असल्याची चर्चा आहे. (Latest Marathi News)

अजित पवार गटाकडून या प्रभागात गणेश नवथरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष या एकाच प्रभागात आमनेसामने आले आहेत. यामुळे ही लढत केवळ दुहेरी न राहता तिरंगी बनली आहे. राजकीय वर्तुळात या तिरंगी लढतीचा फटका प्रणव धंगेकरांना बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रभागात उमेदवारी देताना भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटल्याचीही चर्चा आहे. भाजपकडून गणेश बीडकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती. दुसरीकडे, शिवसेनेकडूनही धंगेकर कुटुंबालाच याच प्रभागातून उमेदवारी हवी होती. मात्र दोन्ही पक्षांमध्ये तोडगा न निघाल्याने अखेर भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, अजित पवार गटाने ग्राउंड रिपोर्ट लक्षात घेऊन गणेश नवथरे यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जाते. प्रभाग क्रमांक 24 मध्ये कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल आणि K.E.M. हॉस्पिटल परिसराचा समावेश आहे. या भागात गणेश नवथरे यांचा जनसंपर्क चांगला असून त्यांनी अनेक वर्षे स्थानिक पातळीवर काम केले आहे. महत्त्वाचे म्हणजे नवथरे हे रविंद्र धंगेकरांचे पूर्वीचे जवळचे सहकारी मानले जातात. मागील निवडणुकांमध्ये ते धंगेकरांच्या प्रचारात सक्रिय होते. त्यामुळे आता भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडूनच धंगेकर कुटुंबाला अधिक अडचण निर्माण होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.






