Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चार-सहा महिने राबले, पण फुलांना भावच नाही! झेंडू उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 20 October 2026, 9:43

डॉ. अशोक बालगुडे

पुणे : “चार-सहा महिने शेतात राबराब राबलो. निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज दिली, अनेक संकटांतून तावूनसुलाखून निघालो; पण हार मानली नाही. अखेर बाजारात मात्र हार पत्करावी लागली. फुले विकून अपेक्षित पैसे मिळाले नाहीत आणि रिकाम्या हाताने घरी परतावे लागले,” अशी व्यथा सासवड आणि जेजुरी परिसरातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली. दसऱ्यासाठी घेतलेल्या कष्टांचा मोबदला न मिळाल्याने आता दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

पावसाची ओढ आणि वाढत्या उष्णतेमुळे झेंडूच्या फुलांचा आकार आणि प्रतवारी घसरली. त्यात बाजारात मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक झाल्याने दरावर दबाव आला. सणासुदीला चांगला भाव मिळेल, या आशेने फुले बाजारात आणलेल्या शेतकऱ्यांचा त्यामुळे हिरमोड झाला. लागवड, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च लक्षात घेता मिळणारा भाव परवडणारा नसल्याची त्यांची खंत आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार आवारात रविवारी ८० ते ९० टन, तर सोमवारी १०० ते १२० टन झेंडूची आवक झाली. पुण्यासह सोलापूर, बीड, सातारा आणि धाराशिव जिल्ह्यांतून फुले विक्रीसाठी आणण्यात आली. मात्र, मोठ्या आवकेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. चार-सहा महिने घेतलेल्या कष्टांनंतरही हातात पुरेसे पैसे न पडल्याने शेतकऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडले.

 

पाहणी होते; मदत मात्र मिळत नाही!

“आमदार-मंत्री येतात, पाहणी करून जातात. शासकीय अधिकारीही पाहणी करतात; मात्र प्रत्यक्ष हातात काहीच मिळत नाही,” असा आजवरचा अनुभव शेतकऱ्यांनी सांगितला. गेल्या दहा-बारा वर्षांपासून ही कुतरओढ सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. शासन घोषणाबाजीत एक नंबर आहे; मात्र प्रत्यक्ष कृतीच्या वेळी काहीच होत नाही, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पाहणी आणि आश्वासनांपलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्ष मदत पडणार कधी, असा त्यांचा सवाल आहे.

“लेकराबाळांना कपडा-लत्ता घ्यायचाही राहून गेला. दिवाळीचा सण कसा साजरा करायचा?” अशी हतबलता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. नैसर्गिक संकटे झेलून पीक उभे करायचे, उत्पादनासाठी पदरमोड करायची आणि ऐन सणासुदीला भावाअभावी निराश होऊन घरी परतायचे, हेच किती दिवस सहन करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

निसर्गाशी झुंज देऊन पिकवलेल्या फुलांना सणाच्या बाजारातही योग्य भाव मिळत नसेल, तर शेतीतील कष्टांचे मोल कोण ठरवणार? बाजार फुलांनी सजला; मात्र उत्पादकांच्या घरातील सणाचा आनंद कोमेजण्याची वेळ आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चार-सहा महिने राबले, पण फुलांना भावच नाही! झेंडू उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट

Tuesday, 20 October 2026, 9:43

सिंधुताई सपकाळ यांच्या मुलावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

Tuesday, 20 October 2026, 9:38

बॉलिवूड टार्गेटवर? अनेक बडे चेहरे निशाण्यावर, पुन्हा अंडरवर्ल्डचा थरार सुरू; पडद्यामागे नेमकं कोण?

Tuesday, 20 October 2026, 9:24

पाळीच्या रक्ताने माखलेले कपडे मागवले, महिलेला अर्धनग्न बसवलं अन् भोंदूबाबाने ‘या’ कारणासाठी केले अघोरी कृत्य

Tuesday, 20 October 2026, 9:03

राज्यात ऑक्टोबर हीटचा जोर कायम; पण काही भागांत वेगळंच चित्र! जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 20 October 2026, 8:27

Daily Horoscope: दसऱ्याचा दिवस कोणासाठी ठरणार गेमचेंजर? मेष ते मीन, जाणून घ्या 12 राशींचं भविष्य!

Tuesday, 20 October 2026, 8:18
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp