Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

The biggest news right now : ‘डिजिटल 7/12’चे जनकच एसीबीच्या जाळ्यात! नवी मुंबईचे अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 May 2026, 13:55

The biggest news right now पुणे, ता. 14 : राज्यातील महसूल विभागात डिजिटल क्रांती घडवून आणणाऱ्या आणि “डिजिटल 7/12 चे जनक” म्हणून ओळख निर्माण केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरच लाचखोरीचा गंभीर आरोप झाल्याने राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नवी मुंबई येथे अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले रामदास हरिभाऊ जगताप (मूळ गाव. जांबुत, ता. शिरूर, पुणे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तब्बल 22 हजार 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. १३ मे २०२६ रोजी नवी मुंबईतील सिडको कार्यालयात ही धडक कारवाई करण्यात आली. एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्येही चर्चांना उधाण आले आहे. The biggest news right now

सिडकोच्या जमिनीच्या करारासाठी मागितली लाच The biggest news right now
मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोच्या 22.5 टक्के योजनेतील जमिनीच्या करार प्रक्रियेसाठी संबंधितांकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. पडताळणीनंतर एसीबीच्या पथकाने कारवाई करत रामदास जगताप यांना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, या व्यवहारात त्यांच्या सांगण्यावरून शिपाई हरेश सोनवणे याने लाचेची रक्कम स्वीकारल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे सोनवणे यालाही एसीबीने अटक केली आहे.

‘डिजिटल 7/12’मुळे मिळाली होती राज्यभर ओळख The biggest news right now
रामदास जगताप यांनी महसूल विभागात डिजिटल 7/12 प्रणाली राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांची राज्यभरात वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे “डिजिटल 7/12 चे जनक” म्हणून त्यांचा उल्लेख केला जात होता. मात्र, जनतेसाठी पारदर्शक यंत्रणा उभी करणाऱ्या अधिकाऱ्यावरच आता भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रशासनात मोठी खळबळ The biggest news right now
एसीबीकडून केवळ लाच प्रकरणाचाच नव्हे तर संबंधित आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. पारदर्शक कारभाराचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. The biggest news right now

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22

जरांगेंसमोर नवं संकट? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्तीचा पोलिसांत गंभीर दावा; नेमकं प्रकरण काय?

Tuesday, 29 September 2026, 15:19

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

Tuesday, 29 September 2026, 14:25
Next Post

The Jackpot Bingo platform is a High-quality Casino Platform Relied upon by UK Players Daily

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp