Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारताचे बांगलादेश समोर केवळ १८७ धावांचे आव्हान;शाकिब आणि इबादत यांची भेदक गोलंदाजी : केएल राहुलची एकाकी लढत…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 December 2022, 15:08

ढाका : शाकिब अल हसन व इबादत हुसैन यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेश संघाने भारताला केवळ ४१.२ षतकांत सर्वबाद १८६ धावांवर रोखले. भारतीय संघाकडून केवळ केएल राहुल याने अर्धशतकी खेळी करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.

ढाका येथील शेर ए बांगला येथील मैदानावर झालेल्या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चांगलाच अंगलट आला. भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. पाचव्या षटकांत शिखर धवन ७ धावा करून परतला. त्यानंतर रनमशीन विराट कोहली देखील ९ धावा करून परतला.

रोहित शर्माने ३१ चेंडूत २७ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी बढती मिळालेला श्रेयस अय्यर देखील फार कमाल दाखवू शकला नाही. श्रेयसने २४ धावा केल्या. के एल राहुलने एकाबाजूने थोडीशी संथ खेळीची सुरुवात करताना लढतीची सूत्रे हाती घेतली.

 

राहुलने ७० चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७३ धावांची खेळी केली. त्याला वाशिंग्टन सुंदर याने १९ धावा करताना सुरेख साथ दिली. मात्र एकाबाजूने सातत्याने पडझड होतच होती. शेवटच्या फलंदाजानी तर केवळ मैदानावर हजेरी लावायचे काम केले.

बांगलादेश संघाकडून शाकिब अल हसन व इबादत हुसैन यांनी भेदक गोलंदाजी करताना भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. शाकिबने १० षटकांत २ षटके निर्धाव टाकताना ३६ धावांत ५ गडी बाद केले. इबादत हुसेन याने ८.२ षटकांत ४७ धावांत ४ गडी बाद केले. मेहंदी हसन मिर्झाने एक गडी बाद केला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46
Next Post

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते विजय देवरकोंडा यांची ईडीकडून तब्बल ९ तास कसून चौकशी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.