Monday, July 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND vs WI 2nd ODI : अक्षर पटेलची झुंजार खेळी धोनीसारखा षटकार मारत जिंकली मालिका ; वेस्ट इंडिजचा २ गडी राखून पराभव..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 25 July 2022, 10:22

पुणे : पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा २ विकेट्सनी पराभव करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑलराऊंडर अक्षर पटेलच्या तुफान अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने दुसरा वनडे सामना जिंकला आहे. अक्षर पटेलच्या ६४ धावांच्या नाबाद अर्धशतकाच्या खेळीने टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा २ गडी आणि २ बॉल राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने २-० ने मालिकेत आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिजवर भारताचा हा सलग १२ वा मालिका विजय आहे. अष्टपैलू अक्षर पटेल भारताच्या विजयाचा हिरो ठरला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ५० ओव्हर्समध्ये ६ विकेट गमावून ३११ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून शाई होपने १३५ चेंडूत ११५ धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ३ षटकार ठोकले. निकोलस पूरनने ७४ धावा, मेयर्सने ३९ आणि ब्रुक्सने ३५ धावांचे योगदान दिले. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ ३११ धावा गाठू शकली. आणि टीम इंडियासमोर ३१२ धावांचे लक्ष्य होते.

वेस्ट इंडिजने दिलेल्या ३१२ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नव्हती. टीम इंडियाकडून शिखर धवन आणि शुभमन गिल सलामीला उतरले होते. यादरम्यान धवन अवघ्या १३ धावा करून बाद झाला. तर शुभमनने ४९ चेंडूत ४३ धावा केल्या. श्रेयस अय्यरने शानदार ६३ धावा करत अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादव ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

 

संजू सॅमसनने वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने ५१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. दीपक हुडाने ३६ चेंडूत ३३ धावा केल्या. शार्दुल ठाकूर अवघ्या ३ धावा करून बाद झाला. आवेश खानने १० धावांचे योगदान दिले.

दरम्यान, टीम इंडियाचे एका मागोमाग एक विकेट पडत असताना अक्षर पटेलने एक बाजू सांभाळून धरली होती. अक्षरने ३५ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीत ५ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. अक्षरच्या या खेळीने टीम इंडियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. टीम इंडियाने 2 विकेट आणि 2 बॉल राखत हा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने २-० ने मालिकेत आघाडी घेतली आहे.

शार्दुल ठाकूरने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने ७ षटकात ५४ धावा देत ३ बळी घेतले. तर दीपक हुडाने ९ षटकात ४२ धावा देत एक विकेट घेतली. अक्षर पटेलने ९ षटकात ४० धावा देत १ विकेट घेतली. युझवेंद्र चहल, आवेश खान आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

 

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाढदिवसाचा आनंद ओसरण्याआधीच काळाचा घाला; मंचरमध्ये एसटी बस-मोटरसायकलच्या धडकेत १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Monday, 13 July 2026, 21:51

सुखी संसाराचं स्वप्न अपूर्ण! मंडप उतरला नव्हता, मेहंदीचा रंगही तसाच होता; माहेरी जातांनाच झाला नववधूचा घात…

Monday, 13 July 2026, 21:12

शहीद संतोष खटाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आळंदी म्हातोबा येथे अभिवादन; स्मृती जपण्याचा निर्धार

Monday, 13 July 2026, 20:37

पुण्यात चोरीचा थरार! एकाच रात्रीत फोडली तीन दुकाने; सीसीटीव्हीची हार्डडिस्कही पळवली

Monday, 13 July 2026, 20:03

मुलगा हवा होता पण… सासरच्यांकडून विवाहितेचा छळ; सतत पैश्यांची मागणी अन् बारश्याच्या दिवशीच घडलं भयंकर

Monday, 13 July 2026, 19:29

प्रेमविवाहानंतर छळ! ‘दुसरे लग्न’? पत्नीची मारहाण, आर्थिक छळ केल्याप्रकरणी एकावर खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 13 July 2026, 18:26
Next Post

Breaking News : देशाचे १५ वे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ ; देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.