Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुणबी प्रकरणासाठी सर्वसामान्यांची अडवणूक! एजंट मार्फतच्या प्रकरणावर मात्र सह्या; युवासेनेकडुन आंदोलनाचा इशारा

सागर घरतby सागर घरत
Wednesday, 11 December 2024, 12:09

-सागर घरत

 

करमाळा : मराठा कुणबी प्रकरणासाठी सर्वसामान्यांची अडवणुक होत आहे. एजंटकडून येणाऱ्या प्रकरणावर डोळे झाकुन सह्या करणारे अव्वल कारकून तसेच नायब तहसीलदार सर्वसामान्यांची अडवणूक करत असल्याचा गंभीर आरोप, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केला आहे. तहसिल तसेच प्रांत कार्यालयातील ऑनलाईन ऑपरेटर, अधिकारी व एजंटच्या मिलीभगतचा हा प्रकार थांबला नाही तर पुढील आठवड्यात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी प्रांत अधिकारी व तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात युवासेनेकडुन म्हटले आहे की, करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आजपर्यंत मराठा कुणबी प्रकरणासाठी अत्यंत गतीमान व पारदर्शक यंत्रणा राबवून अनेकांना कुणबी दाखले मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. याबाबत वेळोवेळी युवासेनेकडुन व पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही जाहीर कौतुक देखील केले आहे. मात्र निवडणुकी पासुन कुणबी मराठा प्रकरणाचा निपटारा अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.

एजंटकडूनच प्रकरणे यावीत, यासाठी ऑनलाईन ऑपरेटर व प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची इच्छा असल्याने अनेक प्रकरणे दोन ते तीन महिन्यांपासून धुळखात पडलेली आहेत. प्रांत व तहसिल कार्यालयातील ऑनलाईन ऑपरेटर तसेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची मिलीभगत असून एजंटकडून आलेली प्रकरणे तात्काळ तहसिल व प्रांत समोर ठेवली जातात, नागरिकांनी स्वतः दिलेली तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून येणारी प्रकरणे अडकवून ठेवणे, किरकोळ कारणे देऊन माघारी पाठवणे, उद्धठ भाषा वापरणे असे प्रकार घडत आहेत.

प्रांत कार्यालयात अनेक महिन्यांपासून प्रकरणे सह्यांसाठी प्रलंबित आहेत. मात्र प्रांत अधिकाऱ्यांना सह्या करायला वेळ भेटत नाहीत प्रांत कार्यालयातीलच काही जण पैशांची मागणी करत आहेत. येत्या आठ दिवसांत सर्व प्रकरणे निकाली न निघाल्यास प्रांत कार्यालयाविरोधात करमाळा येथे धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.

कुणबी प्रकरणासाठी एजंटकडून अनेकांची लुट झाली आहे. याबाबत करमाळा येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी दाखल झालेल्या आहेत. मात्र तरी देखील तहसिल व प्रांत कार्यालयात एजंट लोकांचा सुळसुळाट सुरू असून तहसिल व प्रांत मधील ऑनलाईन ऑपरेटर व या एजंटमध्ये मिलीभगत असल्याने एजंटकडून गठ्ठेचे गठ्ठे सह्या केल्या जातात. मात्र सामान्य लोकांची अडवणूक होत आहे हे चित्र बदलले पाहिजे.
– शंभूराजे फरतडे (युवासेना तालुका प्रमुख)

करमाळयातच प्रांत अधिकाऱ्यांकडून सह्या झाल्या पाहिजेत. सर्कल चौकशी, अव्वल कारकून, नायब तहसीलदार, तहसिलदार यांच्या सह्या झाल्यानंतर प्रांत कार्यालयात हि प्रकरणे जातात. मात्र, दर बुधवारी प्रांत अधिकारी करमाळयात येत असताना हि प्रकरणे कुर्डवाडी प्रांत कार्यालयात पाठवण्याची गरज नाही. या ठिकाणीच प्रांत यांनी सह्या कराव्यात.
-मयुर तावरे, (गटप्रमुखयुवासेना)

 

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

Pune Crime : नाकाबंदीत महिला पोलिसास फरफटत नेणारा कार चालकाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.