राहुलकुमार अवचट

Yawat : पुणे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या 2026 च्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यवत बोरीभडक गटात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. यवत गटातून भाजपाचे उमेदवार अविनाश कुदळे दणदणीत विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला, तर यवत गणातून भाजपाच्या तेजस्विनी पडळकर व बोरीभडक गणातून भाजपाच्या राजश्री म्हस्के यांनी दणदणीत विजय संपन्न केला आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी स्पष्ट दिसत होती यवत गणात भाजपाच्या तेजस्विनी पडळकर सुरवातीच्या मतमोजणीतच विजयी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले होते तर जिल्हा परिषद गटात सुरवातीला आघाडी घेतलेले अविनाश कुदळे मधल्या फेरीत काहीसे पिछाडीवर होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित कुदळे यांनी आघाडी घेतली परंतु अंतिम काही फेरीत पुन्हा अविनाश कुदळे यांनी मतांची सरशी कायम राखत तालुक्यातील 7 गटांपैकी यवत बोरीभडक ही एकमेव जागा भाजपाचे अविनाश कुदळे यांनी निर्णायक आघाडी घेत विजय खेचून आणला. निकाल जाहीर होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला तर बोरीभडक गणातून देखील भाजपाच्या राजश्री म्हस्के यांनी विजय संपादित केला आहे.
दरम्यान या निकालामुळे यवत बोरीभडक परिसरात भाजपची ताकद अधिक भक्कम झाली असून स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.







