Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्त्रियांच्या साहित्याला दिले जाते दुय्यम स्थान; ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांची खंत

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 20 November 2023, 22:10
Women literature gets neglected says dr sangita barve

पिंपरी : “आजच्या आधुनिक काळातही स्त्रियांच्या साहित्याला दुय्यम स्थान दिले जाते. पुरुषी अहंकार आणि प्रपंचातील जबाबदारी सांभाळून स्त्री लेखन करीत असते. मानसिक घुसमट सहन करीत तावून सुलाखून बाहेर येऊन केलेली तिची अभिव्यक्ती गौण ठरवली जाते”, असे विचार साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी ‘स्त्रियांचे साहित्यातील योगदान’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षीय मनोगत मांडताना व्यक्त केली.

ना. धों. महानोर साहित्यनगरी (जयगणेश बँक्वेट हॉल), नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवारी (दि.१९) आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनातील पाचव्या सत्रात इंदुमती जोंधळे, डॉ. अपर्णा महाजन, डॉ. लता पाडेकर यांनी परिसंवादात सहभाग घेतला होता. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, समन्वयक अरुण बोऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. लता पाडेकर यांनी स्त्रीसाहित्याचा मागोवा घेताना महानुभाव पंथातील चक्रधर स्वामींच्या महिला शिष्यांनी सर्वप्रथम साहित्यात योगदान दिले, अशी माहिती दिली. वास्तविक, त्या काळात पाश्चिमात्य देशांतही स्त्रियांना लेखनाची मुभा नव्हती, असे नमूद करून त्यांनी गार्गी, मैत्रेयी यांनी स्वतंत्रपणे साहित्य अभिव्यक्ती केल्याचे सांगितले.‌ साहित्यनिर्मितीत संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई यांनी मौलिक योगदान दिले आहे, अशीही माहिती डॉ. पाडेकर यांनी दिली.

 

डॉ. अपर्णा महाजन यांनी महिला सबलीकरणाची बीजे स्त्री संतांच्या साहित्यांत असल्यानेच महिला सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला, असे मत मांडले. ताराबाई शिंदे यांनी त्यापासून लेखनाची प्रेरणा घेतली, असेही त्यांनी सांगितले. इंदुमती जोंधळे यांनी आपला जीवनपट मांडून, “सावित्रीबाई यांना उभे करण्याचे काम जोतिबांनी केले असले तरी प्रत्येकीला जोतिबा मिळेलच असे नाही!” हे वास्तव मांडले.‌

डॉ. संगीता बर्वे पुढे म्हणाल्या की, “परिसंवादात पारंपरिक स्त्रियांची मानसिकता, सामंजस्य, प्रखर स्त्रीवाद असे विविध विचार मांडले गेले असले तरी ते वास्तव स्वीकारायला पुरुषी मानसिकता सहजासहजी तयार होत नाही. इतकेच नव्हे तर स्त्रियांनाही त्यात काही वावगे वाटत नाही. पुरुषी अहंकार आणि प्रपंचातील जबाबदारी सांभाळून स्त्री लेखन करीत असते. मानसिक घुसमट सहन करीत तावून सुलाखून बाहेर येऊन केलेली तिची अभिव्यक्ती गौण ठरवली जाते. वास्तविक एखाद्या प्रकाशमान लोलकासारखी ही बहुरंगी स्वानुभूती असते; परंतु ती पचवायला समाजाला खूप जड जाते,” असे कटू सत्य अधोरेखित केले.

आपल्या मनोगतातून त्यांनी स्त्री जाणिवांच्या कविता सादर करून श्रोत्यांना अंतर्मुख केले. डॉ. सीमा काळभोर यांनी सूत्रसंचालन केले; तर डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Tamasha is not worst as art says sopan khude in pune

तमाशा कला म्हणून वाईट नाही; ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांचे मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.