Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धरणावर काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार; भटजीची रवानगी थेट येरवडा कारागृहात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 10 December 2024, 15:36

जुन्नर : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या भटजीने विवाहित महिलेसोबत धरणाच्या भिंतीवर एकत्रित काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार करणार्‍या भटजीला ओतूर पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी थेट येरवडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली.

शशांक जोशी (वय-38, रा. ओतूर, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित भटजीचे नाव आहे. याप्रकरणी स्वतः हजर राहून पीडित महिलेने ओतूर पोलीस ठाण्यात भटजीविरुध्द तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ओतूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला व संशयित शशांक जोशी यांची सन 2020 मध्ये फेसबुक अकाउंटमार्फत ओळख झाली. त्यानंतर जोशी हा पीडितेस सतत फोन करू लागला. एकदा पीडित महिला व जोशी हे खुबी येथील खिरेश्वरकडे जाणार्‍या रस्त्यावरील धरणाच्या बंधार्‍यावर असताना त्याने दोघांचे एकत्र फोटो काढले होते.

त्यानंतर जोशी याने वेळोवेळी आपल्या दोघांचे एकत्र काढलेले फोटो तुझ्या नवर्‍याला दाखवेल, अशी धमकी देऊन फोन करून भेटण्यास बोलवत असे. 2020 डिसेंबरमध्ये दुपारच्या सुमारास पीडितेचे पती घरातून बाहेर गेल्याचे बघून आरोपीने जबरदस्तीने घरात घुसून दोघांचे एकत्रित फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले.

 

तसेच त्याबद्दल कुणास काही सांगितले तर आपले फोटो व्हायरल करेल, तसेच माझ्या जिवाचे बरे-वाईट करून घेईल, अशी धमकी फिर्यादीला दिली. यानंतर पुन्हा पुन्हा भेटायचे आहे, असे जोशी म्हणू लागल्याने त्यास पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने फिर्यादीची आई, भाऊ, बहीण यांना देखील फोन करून त्रास दिला. तसेच पीडितेच्या पतीचे मित्र यांना देखील त्याने दोघांचे एकत्रित काढलेले फोटो पाठवले. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे भाजपमधून दुःखद बातमी! माजी नगरसेवक प्रवीण वस्ते यांचे निधन

Thursday, 24 September 2026, 8:54

झोपेतच आगीने घेरलं! 40-50 प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली, 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी

Thursday, 24 September 2026, 8:39

‘तुम्हाला अटक होणार’ म्हणत ज्येष्ठ महिलेला घाबरवलं! काही दिवसांत 76 लाख लुटले; पुण्यातील महिलेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 24 September 2026, 8:27

पाऊस थांबला असं वाटत असतानाच मोठा ट्विस्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Thursday, 24 September 2026, 8:13

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी वरदान? 24 सप्टेंबरला पैसा, काम आणि नात्यांमध्ये काय घडणार?

Thursday, 24 September 2026, 7:46

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57
Next Post
Kudal Talathi caught red hand while taking bribe in javali satara

चार हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले; चुकीचे दस्तनोंदीचे कारण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp