Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 AM College News: प्राचार्यांची कार पार्किंग करताना झालेल्या अपघातात महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; तर एक महिला गंभीर जखमी, हडपसरच्या एएम कॉलेजमधील घटना 

संदीप टूलेby संदीप टूले
Saturday, 2 March 2024, 21:41

केडगाव: हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्राचार्यांची कार पार्किंग करीत असताना कर्मचाऱ्याकडून झालेल्या अपघातात एका महिला कर्मचाऱ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर दुसरी प्राध्यापक महिला जखमी झाली आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शालन दत्तात्रय शेलार (वय ५०, रा. देलवडी, ता. दौंड, सध्या हडपसर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तसेच जखमी महिला प्रा. इरफाना शब्बीर मुल्ला (वय-३२, रा. गुलामअलीनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे हे कारने मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या कार्यालयासमोर आले. तेथे कारमधून उतरत त्यांनी महाविद्यालयातील सेवक राहुल जाधव याच्याकडे कार पार्किंग करण्यासाठी दिली. त्यानंतर शिपाई सीमा देशमुख हिने राहुलकडून चावी घेऊन महाविद्यालयाच्या मैदानात स्वत: कार चालवण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी नियंत्रण सुटल्याने समोर चालत असलेल्या प्रा. मुल्ला यांना धडक देवून कार सुसाट वेगात महाविद्यालयाच्या जिन्याजवळील वॉश बेसीनच्या भिंतीला धडकली. त्यावेळी बेसीनवर कर्मचारी शालन शेलार हात धूवत होत्या. त्यांना पाठीमागून कमरेखाली कारची धडक बसल्याने त्यांच्या दोन्हीही पायांचा चेंदामेंदा झाला. यानंतर दोघींनाही तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शालन शेलार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post
Mahayuti banner outside of matoshree in mumbai

मातोश्रीबाहेर महायुतीची बॅनरबाजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp