Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News | पूर्व हवेलीतील हिंगणगावचा शेतकरी पुत्र किरण पोपळघट बनला DYSP…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 March 2023, 9:59

Uruli Kanchan News | उरुळी कांचन, (पुणे) : जीवनात कधी हताश, उदास, निराश न होता समोर चालत राहणे हा आयुष्याचा नियम आहे. आणि जो या नियमांचं पालन करत आयुष्य जगतो त्याला जीवनात कमी प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. याची प्रचीती हिंगणगाव (हवेली) (Uruli Kanchan) येथील किरण देविदास पोपळघट यांच्या यशातुन दिसून येते.

६७ रँक मिळवून या यशाला गवसणी…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने २०२१ साली घेण्यात आलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेतून पोलीस उपअधीक्षक पदाला किरण पोपळघट यांनी ६७ रँक मिळवून या यशाला गवसणी घातली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना, स्वतःची स्पर्धा स्वतःशीच करत.

आई-वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचा विश्वास सार्थकी लावत. योग्य व काटेकोरपणे नियोजन करत. स्पर्धा परीक्षेला सामोरे जात पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे. परिस्थिती नसताना त्याने यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

 

किरणचे वडील देविदास पोपळघट हे एक शेतकरी आहेत. तर त्यांची आई शशिकला एक गृहिणी आहेत. किरणचा भाऊ रणजीत हा शिक्रापूर येथील वेस्ट इंडिया फोजिंग लिमिटेड या कंपनीत उपव्यवस्थापक म्हणून काम करीत आहे. तर त्यांचा दुसरा भाऊ सुनील हा हडपसर – रामटेकडी येथील एसआरपीएफ येथे कार्यरत आहेत. या यशासाठी किरणला आई शशिकला, वडील दोन भाऊ व पुणे येथील अकॅडमीचे शिक्षक प्रा. मनोहर बोळे व प्रा. रंजन कोळंबे यांचे मार्गदर्शन मिळाले.

किरणचे प्राथमिक शिक्षण हिंगणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण अष्टापूर येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधून सन २००८ साली पूर्ण केले. त्यानंतर त्याने कोथरूड येथील महाराष्ट्र ऑफ टेक्निकल इन्स्टिट्यूट अर्थात एमआयटीतून (MIT)डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग (यांत्रिकी अभियंता) तर पुढे बॅचलर ऑफ इंजीनियरिंगचीची पदवी यांत्रिकी अभियंता (Mechanical Engineering) यामधून २०१४ साली पूर्ण केली.

घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने किरण याने चतुर्श्रुंगी येथील विद्यार्थी सहाय्यक समिती वस्तीगृहात राहत होता. तसेच त्याने विद्यापीठाच्या कमवा व शिका या योजनेतून उदरनिर्वाह करून शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने तळेगाव दाभाडे येथे जेसीबी इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये सन २०१४ ते २०१६ या कालावधीत काम केले. पण लहानपणी मोठे होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न त्याला झोपू देत नव्हते. त्यामुळे किरणने नोकरीला रामराम ठोकला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.

दरम्यान, सन २०१७, २०१८, २०१९ व २०२० साली घेण्यात आलेल्या चारही वर्षी परीक्षा पास झाला. पण किरण गुणवत्ता यादीत बसला नाही. परंतु, किरणने खचून न जाता पुन्हा अभ्यासाची जोरदार तयारी सुरु ठेवली. २०२१ साली घेण्यात आलेल्या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाला असून त्याची पोलिस उपअधीक्षक पदावर निवड झाली आहे. आणि तो लवकरच महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत प्रशिक्षणासाठी जाणार आहे.

याबाबत पुणे प्राईम न्यूजशी बोलताना किरण पोपळघट म्हणाले, “मला चार वेळेस यश मिळवून हि गुणवत्ता यादीत नंबर आला नाही. मात्र हताश व निराश न होता अभ्यास सुरूच ठेवला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जावू नये, पुन्हा प्रयत्न करीत राहावे. परीक्षेमध्ये आलेल्या अपयशाला मेहनत व अभ्यासाची जोड दिल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

अधिकाऱ्याबद्दल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ अंगलट; पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन

तोतया पोलिस अधिकाऱ्याची वडूज पोलिसांनी उतरवली वर्दी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09
Next Post

Pune News : कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.