Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घर का भेदी लंका ढाए! वॉचमनने मेहुण्याच्या मदतीने मालकाला घातला 24 लाखांचा गंडा; दोन्ही आरोपींना हडपसर पोलिसांकडून अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 March 2025, 19:31
two people arrested by hadapsar police for cheating man for 24 lakhs

हडपसर : घर का भेदी लंका ढाए! या म्हणीप्रमाणे घरात काम करणारा वॉचमनच चोर निघाला आहे. वॉचमनने मेहुण्याच्या मदतीने घरमालकाला ऑनलाईन ट्रांजेक्शनच्या माध्यमातून तब्बल 24 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलीसांनी दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

इफतीकार रहिमखान पठाण (वय 31, रा. फ्लॅट नंबर-707,7 वा मजला, रेहान पार्क, गौतम नगर, गोवंडी मुंबई) व मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर (वय 52, सध्या रा. म्हसोबा मंदिराचे पाठीमागे, काळेपडळ, हडपसर पुणे, मुळ रा. पातूर, जि. अकोला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल हे कुटूंबापासून वेगळे एकटेच राहत होते. त्यांना दैनंदिन गरजेच्या कामामध्ये ते राहत असलेल्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करणारा हनीफ नावाचा इसम मदत करीत होता. दरम्यान, फिर्यादी यांच्या वडिलांच्या अकाऊंन्टचा ऑनलाईन अ‍ॅक्सेस घेवून अनोळखी इसमांनी त्यांच्या खात्यामधून वेळोवेळी 24 लाख 45 हजार रुपये काढून फसवणूक केली होती.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4),3 (5), आयटी ऍक्ट 66 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी फसवणूक झालेल्या रक्कमेची बँकेकडून माहीती प्राप्त करून त्याची पडताळणी केली असता, ती रक्कम इफ्तीकार खान आणि नुर जहाँ यांच्या बँक अकाऊंन्टवर ट्रान्स्फर झाल्याची माहिती मिळाली. तसेच वॉचमन म्हणून काम पाहणारा इसम हनीफ हा घटनेनंतर काम सोडून फरार झाला होता.

 

दरम्यान, तांत्रिक तपासामध्ये हनीफ आणि इफ्तीकार खान हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. संशयीत इसमाबाबत उपयुक्त माहिती गोळा करून पोलिसांनी इफ्तीकार पठाण व मोहम्मद अफसर यांना मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपींकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता, त्यांनी गुन्ह्याची पोलिसांना कबुली दिली.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मागदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, अविनाश गोसावी, संदीप राठोड, तेजस पांडे, गायत्री पवार, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर यांच्या पथकाने केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

सलमान खानच्या "सिकंदर "या तिकिटाची किंमत वंदे भारत एक्सप्रेसपेक्षाही महागडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp