Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तिकीटदर दुप्पट, प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ! PMPML च्या अनेक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 June 2025, 16:09

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील लाखो नागरिकांना दररोज बससेवा पुरवली जाते. दररोज 10 ते 11 लाख प्रवासी या सेवेचा वापर करत असताना, प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र दुर्लक्षित राहिल्याचे समोर आले आहे. नुकत्याच तिकीटदरात करण्यात आलेल्या दुप्पट वाढीच्या पार्श्वभूमीवर, ‘नवराष्ट्र’च्या प्रतिनिधीने केलेल्या तपासणीत एक धक्कादायक बाब उघडकीस आली — PMPML च्या अनेक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच बसवलेले नाहीत.

तपासणीदरम्यान असे दिसून आले की, काही बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अस्तित्वातच नाहीत. काही बसमध्ये कॅमेरे आहेत मात्र बंद अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी फक्त कॅमेऱ्याचे खोकले दिसून आले. ही बाब प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर मानली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हे महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळे छेडछाड, पाकिटमार, वादविवाद अशा घटनांवर नियंत्रण ठेवता येते. मात्र, बसमध्ये ही सुविधा नसल्यामुळे अशा गुन्ह्यांचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. रात्री प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी ही परिस्थिती अधिक भयावह ठरते. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. “तिकीटदर तर वाढवत आहेत, पण प्रवाशांच्या सुरक्षेचं काय?” असा संतप्त सवाल अनेक प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

महिला प्रवाशाचे आवाहन

महिला प्रवासी साक्षी पाटील यांनी सांगितलं, “सीसीटीव्ही कॅमेरे महिला सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. अनेक बसमध्ये हे कॅमेरेच नाहीत. चोरी किंवा अन्य चुकीचे प्रकार घडतात. विशेषतः रात्री प्रवास करताना भीती वाटते. त्यामुळे PMPML प्रशासनाने या विषयाकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे.”

प्रशासनाचे दुर्लक्ष – प्रवाशांचा जीव धोक्यात

PMPML ने नुकतीच तिकीट दरात मोठी वाढ केली असली, तरी प्रवाशांच्या मूलभूत सुरक्षेकडे पुरेसे लक्ष देण्यात आलेले नाही, ही बाब गंभीर आहे. हजारो प्रवाशांचा प्रवास दररोज या बसमधून होत असताना, सीसीटीव्हीची अनुपस्थिती ही व्यवस्थेतील गंभीर त्रुटी दर्शवते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

अभिनेता वरुण धवनने पुण्याच्या मेट्रोने केला प्रवास; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, 'हरवलो आहे...'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp