Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“मी मृत्यू डोळ्यांदेखत पाहिला”, कुंडमळा पूल दुर्घटनेत बचावलेल्या योगेशचा थरकाप उडवणारा अनुभव

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 16 June 2025, 10:56

मावळ (पुणे): मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. रविवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत चार निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले, तर ५१ जण जखमी झाले आहेत. या थरारक घटनेत खराडी येथील योगेश आणि शिल्पा भंडारे या पती-पत्नीचा जीव थोडक्यात बचावला आहे.

 

योगेश भंडारे हे रविवारी त्यांच्या पत्नीसह कुंडमळा येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. दुर्दैवाने, त्याचवेळी पूल कोसळण्याची भीषण घटना घडली. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले योगेश यांनी दुर्घटनेवेळचा थरार माध्यमांना सांगितला. “मी माझ्या डोळ्यांनी मृत्यू पाहिला,” असे सांगताना त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. “पूल कोसळला तेव्हा आम्ही पुलाच्या बरोबर मध्यभागी होतो. ज्या तिघांचा मृत्यू झाला, तो क्षण माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. लोकांनी ‘घाई करू नका, पुढे जाऊ नका’ असे सांगितले होते, पण कोणीही ऐकले नाही आणि हे सर्व घडले,” असे योगेश यांनी सांगितले.

दरम्यान, पूल कोसळल्यानंतर नदीपात्रात नेमके किती जण पडले होते, याबाबत प्रशासनाकडे अद्याप ठोस आकडेवारी नाही. रविवारी रात्रीपर्यंत बचावकार्य करून अनेकांना बाहेर काढले होते. मात्र, रात्री अंधारामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. परंतु, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी आणि पाण्याचा  वेग प्रचंड वाढला आहे. सद्यस्थितीत आणखी काही जण बेपत्ता असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

नियमांना हरताळ! मुंढवा ब्रिजवर ‘डेथ राईड’; दुचाकीस्वार उलट दिशेने सुसाट

Tuesday, 7 April 2026, 12:25

बायको-पोराला संपवू अन् इन्शुरन्सच्या पैशात मजा करू! 3 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं, तर पत्नीची हातोड्यानं ठेचून केली निर्घृण हत्या

Tuesday, 7 April 2026, 12:21

भवरापूर परिसरात गोठ्यात शिरून बिबट्याकडून वासराची शिकार; तीन महिन्यांपूर्वी तीन शेळ्यांचाही पाडला होता फडशा

Tuesday, 7 April 2026, 12:13

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 7 April 2026, 11:46

LinkedIn वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचाच! तुमचा डेटा सेफ नाही; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

Tuesday, 7 April 2026, 11:43
Next Post

पुणेकरांना दिलासा! खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात वाढ, पाणीकपातीचे सावट टळणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.