Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी व सातबारा उताऱ्यावर नोंद होणार; डॉ. सुहास दिवसे समितीची राज्य सरकारला शिफारस

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 15 July 2025, 15:18

पुणे: गाव नकाशात असलेल्या तसेच गावोगावी शासकीय वा खासगी प्रयोजनांकरिता वापरात असलेल्या शीव, पाणंद व रस्त्यांना आता कायदेशीर दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या रस्त्यांची नोंद गावदप्तरी व सातबारा उताऱ्यावर घेण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे भविष्यात रस्त्यांशी संबंधित वाद कमी होण्याची शक्यता आहे.

 

समितीचा अहवाल शासनाकडे सादर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार गाव नकाशा, रस्ते आणि मालमत्तेच्या हक्कांबाबत स्पष्ट धोरण तयार करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. डॉ. दिवसे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. या अहवालात गावपातळीवर विशेष मोहीम राबवून रस्त्यांची नोंदणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

रस्त्यांना कायदेशीर दर्जा देण्याचा प्रस्ताव

सध्याच्या घडीला अनेक पाणंद, शीव, वहिवाटीचे रस्ते किंवा शासकीय कारणासाठी बांधले गेलेले रस्ते सातबारा उताऱ्यावर नोंदलेले नाहीत. यामुळे अनेक ठिकाणी अतिक्रमण, वाद आणि न्यायालयीन तक्रारी वाढत आहेत. या रस्त्यांची नोंद सातबाऱ्यावर घेतल्यास त्यांना कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल, असे समितीचे मत आहे.

स्वतंत्र निधी व मोहीम राबवण्याची गरज

समितीने या रस्त्यांची दुरुस्ती, देखभाल आणि अतिक्रमण हटविण्याच्या कामांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची शिफारस केली आहे. तसेच गाव व तालुका स्तरावर विशेष मोहीम राबवून नोंदणीची प्रक्रिया वेगाने पार पाडावी, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वाद मिटण्यास मदत होणार

डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले की, “गाव नकाशावर असलेले पण प्रत्यक्षात अतिक्रमित रस्ते, खासगी जमिनीतून सहमतीने तयार झालेले मार्ग, वहिवाटीचे मार्ग यांची नोंद सातबाऱ्यावर केल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित वाद मिटण्यास मदत होईल. स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती, महसूल यंत्रणा आणि नागरीकांना याचा मोठा फायदा होईल.”

राज्य सरकारकडून या अहवालावर अंतिम निर्णय घेण्याची प्रक्रिया लवकरच अपेक्षित असून, शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास गावपातळीवरील रस्ते व्यवस्थापनाला कायदेशीर चौकट मिळणार आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

धक्कादायक! शाळेतील नोकरी सोडल्याचा राग मनात धरून महिलेवर अत्याचार; अध्यक्षासह दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.