Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोर तालुक्यात आंबाडे मार्गावर गोकवडी, वाघजाईनगर जवळील रस्ता खड्ड्यात; वाहनचालकांची कसरत….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 June 2025, 16:00

इम्रान अत्तार

भोर: आंबाडे मार्गाचे नूतनीकरणाचे काम सुरू असून बहुतांशी रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र मार्गावरील गोकवडी तसेच भोर शहरात शेजारील वाघजईनगर जवळ पावसाळ्याच्या तोंडावर संबंधित ठेकेदाराने रस्ता उकरून ठेवल्याने रस्त्याची दुरवस्था होऊन रस्ता खड्ड्यात गेला आहे. दरम्यान वाहनचालकांना या खड्डे व रस्त्यावरून वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे.

मागील दोन वर्षांपासून भोर- आंबाडे रस्त्याचे काम सुरू आहे. मागील पावसाळ्यात रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना दहा किलोमीटर पर्यंत मोठी कसरत करावी लागत होती. सध्या बहुतांशी रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी निळकंठ -गोकवडी येथे तीनशे मीटर अंतराचा रस्ता रखडलेला असून रस्त्याचे काम दोन वर्षांपासून अपूर्ण आहे. तर वाघजाईनगर जवळ ठेकेदाराने सहाशे मीटरचा रस्ता पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर उकरून ठेवला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यातून वाहने चालवताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान अनेक वाहन चालकांना खड्ड्यातील पाण्यामुळे वाहने चालवताना अडथळा निर्माण होत आहे. काही जणांची वाहने तर खड्ड्यातील पाण्यात बंद पडत असल्याने वाहनचालकांना पाण्यात उतरून वाहने ढकलून बाहेर काढावी लागत असल्याचे चित्र आहे.

ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे भोर-आंबाडे मार्गावरील वरवडी, पाले, बाजारवाडी, पळसोशी, बालवडी, खानापूर, हातनोशी, धावडी तसेच मांढरदेवी गडावर जाणाऱ्या शेकडोहून अधिक ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना खड्डेमय व चिखली रस्त्याचा सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

रस्त्याला तळ्याचे स्वरूप,अपघाताला निमंत्रण…

सध्या तालुक्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू असून पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यातच दुरावस्था झालेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साठत आहे. परिणामी रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले असल्याने अपघाताला निमंत्रण दिल्याचे चित्र आहे.वाहनचालकांना वाहने चालवणे कठीण होत आहे असे संतप्त वाहन चालकांकडून सांगण्यात आले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 22:29

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31

बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता बच्चन कुटुंब? अमिताभ, अभिषेक बच्चनला जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये खळबळ

Monday, 16 November 2026, 20:11
Next Post

तिकीटदर दुप्पट, प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ! PMPML च्या अनेक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp