Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे प्राईम न्यूजचा दणका; बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर गुटख्याच्या कारवाईत घेतलेले दीड लाख रुपये एका तासात रिटर्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 10 July 2025, 19:39

लोणी काळभोर, ता. 10: अवैध तंबाखूजन्य पदार्थ पकडल्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी व जप्त केलेला माल मिळवून देण्यासाठी लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एका कनिष्ठ अधिकारी व त्याच्या बगलबच्च्यांनी मांडवली करून आरोपीकडून दीड लाख रुपये उकळल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. या आशयाची बातमी पुणे प्राईम न्यूजने मंगळवारी (ता. 8 ) प्रसिद्ध केली होती. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याने पुन्हा मध्यस्ती असलेल्या मटका किंगच्या मदतीने अवघ्या एक तासाच्या आत संपूर्ण दीड लाख रुपये आरोपींना रिटर्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात पोलिसांनी 94 हजार 500 रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ रविवारी (ता. 6) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जप्त केला होता. मात्र कारवाई टाळण्यासाठी व पकडलेला माल परत मिळवून देण्यासाठी मटका किंग भाईने एका कनिष्ठ अधिकाऱ्यासोबत मध्यस्थी केली. यावेळी छुप्या बैठकीत संबंधित पोलिस अधिकाऱ्याने संबंधित प्रकरण दाबण्यासाठी तीन लाखांची मागणी केली होती. परंतु, तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे आरोपींनी दीड लाख रुपये दिले. परंतु, या प्रकरणाचा जास्त गाजावाजा झाल्याने संबंधित पोलिस अधिकाऱ्याने हा गुन्हा दाखल केला.

 

दीड लाख रुपये घेतले, मालही पुन्हा दिला नाही उलट गुन्हाही दाखल केला. यामुळे दोन्ही आरोपी हे मानसिक तणावाखाली गेले होते. त्यातच नागरिकांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली होती. या घटनेची ‘पुणे प्राईम न्यूज’ ला माहिती मिळताच, पुणे प्राईम न्यूजने आवाज उठविण्यासाठी लोणी काळभोर येथील गुटख्याच्या कारवाईत दीड लाखांची मांडवली? नागरिकांमध्ये जोरदार चर्चा, पोलिस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात? या आशयाची बातमी करून पोलिस प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.

‘पुणे प्राईम न्यूज’ला बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ अधिकऱ्याने ताबडतोब मध्यस्ती असलेल्या मटका किंगला बोलावणे धाडले. त्यानंतर त्याच्याकडे 50 हजार रुपयांचे 3 बंडल असे दीड लाख रुपये देऊन प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मटका किंगने इमानदारी दाखविली आणि त्वरित आरोपींच्या घरी जाऊन बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर एका तासाच्या आत रक्कम परत केली आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तर रविवारी सुट्टी असल्याने या घटनेची पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्याला कोणतीही कल्पना नाही.

लोणी काळभोर पोलिसांनी सुमारे 3 लाखांहून अधिक रुपयांचा माल पकडला आहे. यामध्ये अवैध तंबाखूजन्य पदार्थ असलेला 60 हजार रुपयांचा माल होता. तर उर्वरित अडीज लाखांचा माल हा अधिकृत असून त्याला विकण्याची शासकीय परवानगी होती. अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसेच पोलिसांनी कारवाईत तर केवळ 94 हजार 500 रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला मग उर्वरित माल गेला कुठे हा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांनी नेमका विश्वास ठेवायचा कोणावर? हा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पुणे शहर पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.

‘पुणे प्राईम न्यूज’ च्या हाती व्हिडीओ

लोणी काळभोर येथील कुख्यात मटका किंगने आरोपीच्या चुलत्यांना दीड लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. तसेच आरोपींच्या घरी जाऊन झालेल्या प्रकरणाबाबत चर्चा केली. यावेळी मटका किंगने या सर्व घटनेची माहिती सांगून पोलिस यंत्रणेचा भंडाफोड केला. आहे. तसेच याबाबत कोणाकडेही तक्रार करू नका. पोलिस कोणालाही सुट्टी देत नाहीत. अशी  धमकी देऊन आरोपींना घाबरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. सदर बोलतानाचा व्हिडीओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला आहे. तसेच योग्य वेळ आल्यानंतर व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

साहेब कारवाई कधी?

स्वच्छ प्रतिमा व कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ओळख आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील गुटखा कारवाईत दोषी असणाऱ्या कनिष्ठ अधिकारी व त्याच्या साथीदारांवर पोलिस आयुक्त साहेब काय कारवाई करणार? की त्यांना अभय मिळणार? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच पोलिस अधिकारी व आरोपींमध्ये मांडवली करणार एक मटका किंग असल्याने पोलिसांचे अवैध धंदेवाल्यांशी हितसंबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मटका किंगवर काय कारवाई होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इंदापुरात सोसाट्याच्या वादळाने नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरचे पत्रे उडाले; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Friday, 5 June 2026, 22:56

कर्वेनगरमध्ये सोसायटीच्या 32 लाखांवर ‘डल्ला’; माजी प्रशासक आणि साथीदारावर गुन्हा दाखल

Friday, 5 June 2026, 22:29
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14
Next Post

रिल्सचा नाद नडला; स्टंट करताना गाडी ३०० फूट दरीत कोसळली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.