Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: भाजपला दूर ठेवण्यासाठी गेमिंग! सुप्रिया सुळे-अजित पवारांमध्ये चर्चा; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 12 November 2025, 18:18
Pune Politics: Gaming to keep BJP away! Discussion between Supriya Sule-Ajit Pawar; Will both nationalists come together in the local body elections?

Photo-Social Media

पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Pune Politics) निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर (Ajit Pawar) राजकीय समीकरणं अतिशय (Supriya Sule) वेगाने बदलताना दिसत आहेत. 246 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी मतदानाची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे आणि आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी माध्यमांशी बोलताना “अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांच्यात निवडणुकीपूर्वी चर्चा झाली आहे आणि दोन्ही एकत्र येऊन लढण्यासाठी सकारात्मक विचार करत आहेत. अजित दादा याबाबत काका शरद पवार यांच्याशी लवकरच अंतिम संवाद साधून योग्य तो निर्णय घेणार आहेत,” असं सांगितलं. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चाना अधिक बळ मिळालं आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अजित पवारांच्या गटाशी टायमिंग साधत डाव टाकला असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. बीड, चंदगड आणि बार्शी येथे दोन्ही गट एकत्र येत असल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, चंदगड नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही गटांना एकत्र आणण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केल्याची माहिती स्थानिक नेत्यांनी दिली. ‘भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हाच आमचा अजेंडा आहे’ असं स्थानिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांनी शरद पवारांपासून बाजूला होत वेगळा गट तयार करून सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी ही दोन तुकड्यांत विभागली होती. त्यानंतर शरद पवारांना नवा पक्ष स्थापन करावा लागला होता. मात्र, या दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींमुळे पुन्हा एकदा “पवार घराण्यातील समझोता” या चर्चांना ऊत आला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतात की स्वतंत्रपणे रणनिती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. स्थानिक पातळीवर नेतेमंडळींच्या बैठका सुरू असून, पुढील काही दिवसांत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नव्या राजकीय हालचालींनी निवडणुकीपूर्वीचा वातावरण अधिक तापलं असून, आगामी काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार असल्याचं निरीक्षकांचे म्हणणं आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Shirur News: Leopard terror in Shirur! A leopard entered a cowshed in Waghale and killed goats and sheep; villagers are scared

Shirur News: शिरूरमध्ये बिबट्याची दहशत! वाघाळे येथे गोठ्यात घुसून शेळ्या-मेंढ्यांचा पाडला फडशा; ग्रामस्थ भयभीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.