Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: आरक्षण जाहीर होताच, पुण्यात शरद पवार गटाची अजित दादांबाबत मोठी घोषणा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 11 November 2025, 22:54
Pune Politics: As soon as reservation was announced, Sharad Pawar group made a big announcement regarding Ajit Dada in Pune...

Photo-Social Media

पुणे : महापालिका निवडणुकांसाठी (Pune Politics) आरक्षण सोडत जाहीर होताच (Sharad Pawar) शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह संचारला असून, पक्षांच्या गाठीभेटी, बैठका आणि संभाव्य आघाड्यांबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी पुण्यात झाली. या बैठकीनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची स्पष्ट भूमिका मांडली.

 

“पुणे महानगरपालिका निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार आहोत. महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत उघड किंवा गुप्त युती करायची नाही, हा निर्णय आजच्या बैठकीत ठामपणे घेण्यात आला,” असं प्रशांत जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात स्थानिक पातळीवर विविध पक्षांमध्ये वेगवेगळ्या आघाड्यांच्या चर्चा सुरू आहेत. कोल्हापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबत चर्चांना उधाण आलं असलं, तरी पुण्यात तसं होणार नाही, असं जगताप म्हणाले. “महायुतीने पुण्याचं वाटोळं केलं आहे. त्यांच्या विरोधातच आम्ही लढणार आहोत,” असं ते ठामपणे म्हणाले.

जगताप पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीतील आमचे भागीदार म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस आहेत. आम्ही त्यांच्यासोबतच निवडणूक लढवणार आहोत. याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असून, अंतिम निर्णय शरद पवार घेतील.”

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटात पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ होणार असल्याची माहितीही जगताप यांनी दिली. “आमच्याकडे वीस ते पंचवीस नवीन प्रवेश येणार आहेत. मात्र यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. सक्षम कार्यकर्ते असतील, तेथे बाहेरून ‘नवरदेव’ आणायची गरज नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत जाण्याचा कोणताही विचार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरे यांच्या मनसेसोबत आघाडीबाबतचा निर्णयही वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल, असं जगताप यांनी सांगितलं. आरक्षण सोडतीनंतर राजकीय समीकरणं नव्याने मांडली जात असतानाच पुण्यातील महापालिका रणसंग्राम अधिकच रोचक होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

rahuri

rahuri : राहुरी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! भाजपने दिला उमेदवार, कर्डिले विरुद्ध तनपुरे लढत पुन्हा रंगणार

Wednesday, 1 April 2026, 12:30

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28
Next Post

Daily Horoscope: कालभैरवाची कृपा आज कोणावर! तर कोणाच्या वाट्याला संकट? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.