Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: ‘सहारा’च्या धानोरी येथील जमीन खरेदी-विक्रीत बिल्डरकडून हजारो कोटींचा ‘झोल’; सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड यांचा पुण्यातील पत्रकार परिषदेत आरोप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 7 November 2025, 19:30
Pune News: Thousands of crores of rupees were 'swindled' by the builder in the purchase and sale of land in 'Sahara's' Dhanori; Social activist Vishakha Gaikwad's allegations in a press conference in Pune

Pune Prime News

संदीप बोडके

पुणे: पुण्यातील मुंढवा येथील सरकारी (Pune News) जमीन विक्रीचा घोटाळा (Pune Crime) उघडकीस आला असतानाचा धानोरी येथील बहुचर्चित सहारा समूहाच्या 108 एकर जमिनीच्या विक्रीत हजारो कोटींचा घोटाळा समोर आला आहे. या जमीनीच्या खरेदी-विक्रीत खूप मोठा गैरव्यवहार झाला असून यामध्ये गुंतवणूक केलेल्या जवळपास 550 गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. 07) पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची पोलखोल केली.

विशाखा गायकवाड यांनी बिल्डर स्वप्नील बाफना, सागर गांधी, डॉ. निजानंद खामकर यांच्यासह बावीसहून अधिक विकसक या घोटाळ्यात सामील असल्याचा हल्लाबोल करत बिल्डरांच्या काळ्या कारनाम्यांचा जोरदारपणे पर्दाफाश केला. वेळप्रसंगी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शौकत इनामदार, बी.वी.राव, प्रसाद टिंगरे यांनीही याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या गैरव्यवहारात बिल्डर (विकसक), मुद्रांक नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी तसेच एजंट यांचा सहभाग असल्याची माहितीही सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड यांनी दिली. यापुढे बोलताना गायकवाड म्हणाल्या, “सहारा समूहाच्या मालमत्ता विक्रीतून येणाऱ्या रकमेच्या 90 टक्के रक्कम सहारा सेबी खात्यावर जमा करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, विकसकाने या आदेशांचे उल्लंघन करत 50 टक्क्यांहून अधिक रक्कम स्वतःकडे वळवली. तसेच बनावट कागदपत्रे वापरून कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक शुल्काची हेराफेरी केली. अधिकाऱ्यांनी 2014 चेच बाजारमूल्य दाखवून पुढील दहा वर्षातील सर्व दस्तऐवज तयार केल्याने शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदारांना अजूनही मोबदला तसेच सदनिका मिळाल्या नाहीत. त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कमही मिळाली नाही. असे असताना या जमीनीचा विक्री व्यवहार होतोच कसा? काही वर्षांपूर्वी सहारा समूह अवसायानात गेल्याने सेबीने हि मालमत्ता ताब्यात घेतली होती व न्यायालयाने या जमिनीच्या विक्री करताना काही नियम आणि अटी घालून दिल्या होत्या. ज्यामध्ये जमिनीची विक्री किमंत शासकीय दरापेक्षा कमी नसावी हि प्रमुख अट होती. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्तीना केराची टोपली दाखवत विक्री व्यवहार पूर्ण केले.

जमीन विक्रीमधून येणाऱ्या रकमेपैकी 90 टक्के रक्कम सहारा सेबी या खात्यावर जमा करावी आणि यातून गुंतवणूकदारांची रक्कम द्यावी. असा न्यायालयाचा आदेश होता. मात्र, प्रशासनातील अधिकारी व काही बिल्डर यांच्या संगनमताने ह्या जमिनीची कवडीमोल दराने विक्री झाली. यामध्ये न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली असून गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड यांनी या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज शुक्रवारी पुणे येथे पत्रकार परिषद घेत यात दोषी असलेल्या सर्वावर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे तसेच प्रसंगी न्यायालयातहीदाद मागणार असल्याचे निक्षून सांगितले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाघोलीतील प्रकल्पांना ‘खराडी’चे लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल? आमदार माऊली कटके आक्रमक; जाहिरातींमध्ये वाघोलीचा अधिकृत उल्लेख करण्याची मागणी

Tuesday, 24 November 2026, 11:17

घरच्यांची लग्नाला संमती, साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तरीही हिंजवडीत प्रेमाचा भयानक शेवट; धक्कादायक कारण आलं समोर

Tuesday, 24 November 2026, 10:13

मुंबई-पुणे महामार्गावर AI ची नजर! खड्डे आणि अपघातप्रवण ठिकाणे शोधणार तंत्रज्ञान

Tuesday, 24 November 2026, 9:50

पुण्यात आरटीओने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांचे आंदोलन तूर्तास स्थगित…

Tuesday, 24 November 2026, 9:06

पुण्यातील कॉस्मेटिक्स दुकानात FDA चा छापा! क्रीम आणि हेअर ऑईलसह 7.30 लाखांचा माल जप्त

Tuesday, 24 November 2026, 8:54

मुंबईकरांनो, अलिबाग आता फक्त 45 मिनिटांवर! समुद्रावर उभा राहणार 3,500 कोटींचा भव्य पूल

Tuesday, 24 November 2026, 8:47
Next Post
Manoj Jarange Patil: Manoj Jarange's murder conspiracy! Accused's wife makes shocking claim; "Husband was kept in jail by feeding him alcohol for a month, he considers Jarange Patil as God!"

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या हत्येचा कट! आरोपीच्या पत्नीचा धक्कादायक दावा; "नवऱ्याला महिन्याभर दारू पाजून अडकवलं, तो जरांगे पाटलांना देव मानतो!"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp