Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: ‘या खासदार बाईंना आवरा’ ऐन दिवाळीत सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली; मेधा कुलकर्णींच्या अटकेची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 19 October 2025, 19:58
Pune News: 'This MP is a disgrace', ruling BJP and NCP clash during Diwali; Demand for Medha Kulkarni's arrest

Photo-Social Media

पुणे: भाजप खासदार (Pune News) मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्यावर (Rupali Thombre) धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. शनिवारवाडा परिसरात घडलेल्या घटनेनंतर त्यांनी भाजपवर आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, पुण्यात भाजपने खासदार मेधा ताई यांना आवरावे. शनिवारवाडा ही वास्तू कोणाच्या बापाची नाही. शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य आणि पेशव्यांचा वारसा आहे. पुणेकर सर्व जाती धर्मांचे आहेत. मेधा कुलकर्णी पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहेत. त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहेत. कोथरुडमध्ये नाटकं करून आता कसब्यात येऊन धार्मिक तेढ निर्माण करणे हा गंभीर प्रकार आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. प्रार्थना असो किंवा दुवा करणे असो, ते दोन्ही श्रद्धेचेच प्रतीक आहे, हे त्यांना समजत नाही किंवा त्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शनिवारवाड्यामध्ये त्यांनी केलेल्या कृत्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.

शनिवारवाडा परिसरात आज भाजप खासदार मेधा कुलकर्णी, पतीत पावन संघटना आणि इतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. या परिसरात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता आणि त्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर आंदोलकांनी त्या ठिकाणी जाऊन गोमुत्र शिंपडून परिसराचे शुद्धीकरण केल्याचा दावा केला. एवढ्यावरच न थांबता आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत वातावरण तापवले.

या वेळी संबंधित परिसरात असलेली मजार हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यांनी परिसरात भगवा झेंडा फडकवण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना तातडीने थांबवले आणि तो परिसर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले. काही वेळाने तणाव निर्माण झाल्यानंतरही पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगितले की पुरातत्व विभागाचे अधिकारी येत आहेत. त्यानंतर काही वेळातच आंदोलकांनी परिसरात भगवा झेंडा फडकवला आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Daily Horoscope: आजचा सोमवार कोणासाठी भाग्यशाली? नोकरी, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांत कोणाला मिळणार यश; वाचा 12 राशींचे भविष्य

Monday, 16 November 2026, 7:30

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08
Next Post
Pune Crime: Gambling on Diwali by fighting fighter cocks for money; Wanawadi police take strong action

Pune Crime: दिवाळी निमित्त पैशावर फायटर कोंबड्यांची झुंझ लावून जुगार; वानवडी पोलिसांची धडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp