Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणेकरांना दिलासा ! 40% मिळकत करातील सवलत कायम राहणार; पीएमपीएमएलची भाडेवाढ होणार नाही…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 17 March 2023, 19:47

मुंबई : Pune News : पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास (tax-exemption-will-continue) घरपट्टीमध्ये ४० टक्के (40-income-tax) सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत (pune news) पुणेकर नागरिकांची असलेली मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज विधान भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार माधुरी मिसाळ,आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिका माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. (pune news)

४० टक्के सवलत रद्द करण्याबाबत निर्देश

राज्य शासनाने सन २०१९ मध्ये महानगरपालिकेचा ठराव विखंडन करुन घरपट्टीमध्ये देत असलेली ४० टक्के सवलत रद्द करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. सदर निर्देश रद्द करून पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना यापूर्वी देण्यात येणारी ४० टक्के सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी पुणेकर नागरिकांची मागणी आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पुणेकर नागरिकांचा हा प्रश्न सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय होईल आणि पुणेकर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत

 

पीएमपीएमएलची भाडेवाढ होणार नाही

पुण्यातील पीएमपीएमएलची बससेवा ही अतिशय महत्त्वाची आहे. ही बससेवा केवळ पुणेच नव्हे तर पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातही कार्यरत आहे. २००४ पासून पीएमपीएमएलची भाडेवाढ न झाल्याने मोठा आर्थिक भुर्दंड पीएमपीएमएला‌ सहन करावा लागत होता. हा ताण कमी करण्यासाठी पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील बससेवेनुसार तूट देत होती. पण तरीही पीएमपीएमएलवरील ताण कमी होत नाही. त्यामुळे आता यापुढे पीएमआरडीएने देखील यात आपला भाग उचलून पीएमपीएमएलवरील ताण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पीएमआरडीएचे आयुक्त हे पीएमपीएमएलचे संचालक म्हणून काम पाहणार आहेत.

पिंपरी चिंचवड प्रमाणे पुणे मनपा क्षेत्रातील शास्तीकर माफ होणार!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामांना लागू असलेला शास्तीकर माफ करण्याचा‌ निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने घेतला होता. मात्र, पिंपरी चिंचवड प्रमाणे पुणे मनपा क्षेत्रातही अनाधिकृत बांधकामे असल्याने पुणे मनपा क्षेत्रासही शास्तीकर माफ व्हावा, अशी मागणी वारंवार होत होती. त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली असून, यासंदर्भातील निर्णय आगामी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post
Cyber theft cheated man for ten lakh rupees lonikand pune

Pune Crime News : सायबर चोरट्यांची नवी क्लुपी; अंकाऊट व्हेरीफिकेशनच्या बहाण्याने घातला तब्बल ७८ हजारांना गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.