Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: लायटर की पिस्तूल? पुण्यातील हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 21:55
Pune News: Lighter or pistol? Hadapsar police in Pune expose the 'lies' of Kothrud police

Photo-Social Media

पुणे: काही दिवसांपूर्वी कोथरूड (Pune News) परिसरातील श्री सुवर्ण सोसायटीत (Pune Police) घरफोडीचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी चोरट्यांनी थेट सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर पिस्तूल दाखवून दहशत माजवली होती. मात्र, त्यानंतर कोथरूड पोलिसांनी पत्रकार परिषदेत “कॅमेऱ्यात दिसलेली वस्तू पिस्तूल नसून पिस्तूलासारखा दिसणारा लायटर आहे” असा ठाम दावा केला होता. त्यामुळे या घटनेवर पडदा पडल्यासारखे वाटत असतानाच आता हडपसर पोलिसांनी या प्रकरणाला नवा वळण दिला आहे.

हडपसर पोलिसांनी वाहन चोरीप्रकरणी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तपासादरम्यान एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. यातील एक आरोपी हा नेमका कोथरूडमधील घरफोडी प्रकरणात सीसीटीव्हीत दिसणारा मुलगा असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. म्हणजेच, कोथरूडमध्ये ज्यावेळी तो कॅमेऱ्यासमोर आला, तेव्हा त्याने खरेच पिस्तूल दाखवले होते, लायटर नव्हे.

२ ऑक्टोबर रोजी कोथरूडमधील श्री सुवर्ण सोसायटीत हा प्रकार घडला होता. त्या दिवशी चोरट्यांनी सोसायटीत शिरून घरफोडीचा प्रयत्न केला आणि रहिवाशांना धमकावण्यासाठी कॅमेऱ्यात पिस्तूल व इतर हत्यारे दाखवली. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु कोथरूड पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत “प्रकरण गंभीर नाही, नागरिकांनी घाबरू नये” असे सांगत हात झटकले होते.

मात्र, अवघ्या सहा दिवसांत हडपसर पोलिसांच्या कारवाईमुळे हा पोलिसांचा दावा चुकीचा ठरला आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या अल्पवयीनांकडून एकूण ८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडे मिळालेल्या पिस्तुलानेच कोथरूडमध्ये दहशत माजवण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

 

हडपसर पोलिसांच्या या तपासामुळे केवळ घरफोडी प्रकरणाचा उलगडा झाला नाही, तर कोथरूड पोलिसांचा निष्काळजीपणा आणि चुकीचा दावा देखील उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या तपासपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील काळात या अल्पवयीनांना न्यायालयीन प्रक्रियेनंतर सुधारगृहात ठेवण्याची शक्यता आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भिगवण बाजार समितीत बाजरीला क्विंटलमागे 4,501, गव्हाला 4,051, तर कांद्याला 5,000 रुपये दर

Friday, 23 October 2026, 9:04

थोड्या पैशांचं आमिष अन् वारंवार स्त्रीबीज संकलन; IVF रॅकेटचा पर्दाफाश, 29 लाखांची रोकड जप्त

Friday, 23 October 2026, 8:56

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज हवामानाचा दुहेरी खेळ! काही भागांत पावसाची शक्यता, तर अनेक ठिकाणी कोरडं वातावरण

Friday, 23 October 2026, 8:13

Daily Horoscope: 23 ऑक्टोबरला ग्रहांची चाल बदलणार चित्र? मेष ते मीन, तुमच्या राशीत काय घडणार? वाचा

Friday, 23 October 2026, 7:51

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36
Next Post
Shirur Crime: Youth stoned to death in Shirur; Suspect in police custody....

Shirur Crime: शिरूरमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून; संशयित पोलिसांच्या ताब्यात....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp