Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रस्टने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना’अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी एकूण 61 मोफत कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमजोर पण अभ्यासू विद्यार्थ्यांना मदत करणे हा योजनेचा मुख्य हेतू. सध्या या योजनेत पुण्यातल्या 55 मराठी शाळांमधील तब्बल 550 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व ट्रस्टकडून घेतलं गेलं आहे. (pune news)

ट्रस्टची ‘जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना’ही 2010 पासून सुरू आहे आणि योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी एकूण 61 मोफत कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीबीए, बिझनेस डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षा, UPSC-MPSC, डिजिटल मार्केटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्युटीशियन, टेक्निशन, फॅशन डिझाइनिंग, इलेक्ट्रिशियन, टॅली असे अनेक प्रकारचे कोर्सेस यामध्ये समाविष्ट आहेत.
हे कोर्सेस करायचे असतील तर इच्छुकांनी दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन फॉर्म भरायचा आणि मग तो फॉर्म संबंधित प्रशिक्षण केंद्रात जमा करायचा. एवढी सोपी प्रक्रिया आहे. या उपक्रमामुळे अनेक मुलांना चांगले मार्गदर्शन मिळतंय आणि शेकडो युवकांना रोजगाराच्या नव्या संधीही तयार होतायत. अशा प्रकारे ट्रस्टने शिक्षण आणि कौशल्यविकासासाठी दिलेलं हे योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे.







